भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेलं विधान सध्या खूपच चर्चेत आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे. त्या मोदींना आव्हान देऊ शकत नाही. त्यांच्या विधानाचा अर्थही तसा घेऊ नये, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “सर्वांना मिटवून टाका…” पीएफआयवरील बंदीनंतर अन्य एका संघटनेचा उल्लेख करत नितेश राणेंचं विधान

पंकजा मुंडेच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे काय म्हणाले?

पंकजा मुंडे यांच्या विधानाबाबत विचारलं असता एकनाथ खडसे म्हणाले की, मी अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं असेल, तर मला कुणीही पराभूत करू शकत नाही, ही त्यांची भावना असेल, त्यांनी मोंदीचं नाव नेमक्या कोणत्या अर्थाने घेतलं, हे कदाचित मला सांगता येणार नाही. पण यातून मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे. मला वाटतं त्या मोदींना आव्हानही देऊ शकत नाही आणि त्यांच्या विधानाचा तसा अर्थही घेऊ नये. कारण त्या पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेकदा मोदींबाबत किंवा पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत नाराजी व्यक्ती केली आहे. तरीही त्या केंद्रीय नेत्यांचं नेतृत्व मान्य करून आपल्या पक्षासाठी काम करत आहेत, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

हेही वाचा- “पंकजा मुंडे पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून…” प्रीतम मुंडेंचं विधान चर्चेत

पंकजा मुंडेंचं वक्तव्य काय?

“आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपरिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलीकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत,” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader eknath khadse reaction on pankaja munde statement about pm narendra modi dynasty rmm