जळगावमध्ये शासन तुमच्या दारी हा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमात येण्यासाठी लोकांना धमकावलं जातं आहे. आमचा शासकीय कार्यक्रमाला विरोध नाही तर या धमक्यांना विरोध आहे असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर साठी बुद्धी नाठी असं जे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं त्यालाही एकनाथ खडसेंनी उत्तर दिलं आहे.

नाथाभाऊ नेमकं काय म्हणाले?

“आम्ही साधे काळे झेंडे दाखवले तर एवढी धास्ती बाळगायचं कारण काय. आमचा विरोध सरकारच्या कार्यक्रमाला नाहीच. आमचा विरोध दिल्या जाणाऱ्या धमक्यांना आहे. गुलाबराव पाटील यांना कुणी सांगितलं आहे की कार्यक्रम होऊ नये आम्ही म्हणतोय. गुलाबराव पाटील मला म्हणाले साठी बुद्धी नाठी. गुलाबराव काय साठीपर्यंत पोहचणार नाही का? त्यांनी पोहचावं अशी माझी इच्छा आहे. त्यांचे वडील साठीपर्यंत पोहचलेच असतील ना? मी साठ वर्षांचा नाही तर ७२ वर्षांचा आहे, त्यामुळे साठी बुद्धी नाठीचा काही संबंध नाही.”

Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Cases of sudden hair loss in Shegaon taluka increased again
शेगावातील केसगळतीची रुग्णसंख्या १४९ वर, भयाची व्याप्ती वाढली
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री

गुलाबराव पाटील हे अपयश झाकत आहेत

“गुलाबराव पाटील हे आपलं अपयश झाकत आहेत. गिरीश महाजन यांची दातखीळ बसली आहे. जे गिरीश महाजन कापसाच्या प्रश्नावर आंदोलन करत होते ते आता कुठे तोंड लपवत आहेत? कुठे गेलं बडबड करणं, उपोषण करणं? कुठे गेली ती नौटंकी? सिंचनासाठी एक रुपया तुम्ही का देत नाही? ” असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. आमचे मंत्री हांजी, हांजी करत फिरतात. यांची प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी निधी आणण्याची पत नाही. असंही नाथाभाऊंनी म्हटलं आहे.

जळगाव जिल्ह्यात शासन आपल्या दारी ही योजना जी राबवण्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत. त्यासाठी ७५ हजार लोक उपस्थित रहावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. पेरणीचे दिवस असल्याने इतके लोक येण्याची शक्यताच नाही. जे काही लाभार्थी आहेत त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून दम देणं, तसे मेसेज देणं आणि दहशत निर्माण केली जाते आहे.असाही आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. आत्ता एक मेसेज फिरतोय की रेशनच्या लाभधारकांनी आलं नाही तर पुढचे तीन महिने तुम्हाला रेशन मिळणार नाही. सरपंचानाही पत्र देण्यात आलं आहे यामध्ये सहभागी व्हा नाहीतर तुमचे अनुदान बंद करण्यात येईल. मुख्यमंत्री जर इतके लोकप्रिय आहेत तर ही जबरदस्ती का केली जाते आहे? असा टोलाही एकनाथ खडसेंनी लगावला आहे.

Story img Loader