संजय राऊत यांनी जेव्हा फोटो पोस्ट केला होता तेव्हा त्यांनी नाव घेतलं नव्हतं. आता मात्र त्यांचं म्हणणं आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांचे २७ फोटो, व्हिडीओ माझ्याकडे आहेत. जर ते असतील तर संजय राऊत यांनी ते महाराष्ट्रच्या समोर आणावेत म्हणजे खरं-खोटं काय ते समजेल. महाराष्ट्रात सध्या अस्थिर स्थिती आहे. अशावेळी एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने अशा पद्धतीने वागणं योग्य नाही. मात्र फोटो समोर आल्यावर खरं खोटं करता येईल असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुषार दोशी यांची बदली ही प्रशासकीय बाब आहे. त्यावर मी भाष्य करणार नाही असं खडसे म्हणाले. छगन भुजबळ यांनी कायमच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला आहे. मराठा समाजाविषयी द्वेष असण्याचं काही कारण नाही. ही भूमिका प्रत्येकानेच घेतली पाहिजे असं मला वाटतं असंही खडसे म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

‘महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथील कॅसिनोत जुगार खेळत आहेत’ अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली होती. याबरोबरच बावनकुळे कॅसिनोमध्ये बसले असल्याचे छायाचित्र जोडले. कॅसिनोमधील जुगारात बावनकुळे यांनी साधारण साडे तीन कोटी उडविल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय खेळले तर बिघडलं कुठे? अशी पोस्ट राऊत यांनी केली होती.

‘मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या तळ मजल्यावर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे”, असा खुलासा बावनकुळे यांनी केला. ज्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. आज सकाळीच संजय राऊत यांनी भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी असल्याचंही म्हटलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना याविषयी विचारलं असता त्यांनी जे काही फोटो व्हिडीओ आहेत ते संजय राऊत यांनी समोर आणावेत असं त्यांनी म्हटलं आहे.