राज्यात राजकीय उलथापालथ झाली असून अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड पुकारले आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीत पडले असून पवारांनी आता बंडखोर आमदारांविरोधात बडगा उगारला आहे. अजित पवारांसह नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत पत्रकावरून यासंदर्भातील माहिती दिली. पक्षविरोधी कृत्यांचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनजंय मुंडे, धर्मराव आत्रम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तसंच, यांना विधानसभेत अपात्र करावे, अशी मागणीही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात यावर या नऊ आमदारांचं भवितव्य अवलंबून आहे.

दरम्यान, काल (२ जुलै) अजित पवारांसह शपथविधीच्या कार्यक्रमात दिसणारे अनेक आमदारांनी आज तटस्थ भूमिका घेतली आहे. तर, अमोल कोल्हे यांनी शरद पवारांच्या बाजूनेच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ५ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांसोबत किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार आहे.