‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच मावळ्यांची वेषभूषा ऐतिहासिक संदर्भांना धरून नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. अशा चित्रपटांची निर्मिती कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम त्यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना दिला आहे. असे असतानाच संभाजीराचे छत्रपतींच्या या भूमिकेला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित तथ्यांची मोडतोड राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा >>> ‘हर हर महादेव’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावर संभाजीराजे संतापले, इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप

Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

राष्ट्रवादी काँग्रेस हा कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा असलेला पक्ष आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड कदापि सहन केली जाऊ शकत नाही. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित पुरावे उपलब्ध असलेली तथ्ये जशीच्या तशी दाखवावीत, कुठेही इतिहासाशी छेडछाड करू नये, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली आहे.

हेही वाचा >>> ‘हर हर महादेव,’ ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटांविरोधात रस्त्यावर उतरणार का? संभाजीराजे म्हणाले, “मी तर…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा दिला आहे. ‘महाराष्ट्रात शिवाजी महराजांचा चुकीचा, खोटा, इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरे यांनी सुरू केली. ‘जाणता राजा’ हे महानाट्य हे त्याचे एक रुप आहे. कारण त्यांचे लिखित पुस्तक होतेच. तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीत काही जण करत आहेत. आम्ही विरोध करुच पण संभाजीराजे याच्या रुपाने एक आवाज मिळाला,’ अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

हेही वाचा >>> भाजपाच्या ‘जागर मुंबईचा’ मोहिमेला, अनिल परब यांचे जशास तसे उत्तर; म्हणाले “मातोश्री हे देऊळ…”

संभाजीराजे छत्रपतींची काय भूमिका?

“छत्रपती शिवाजी महाराज किंवा मावळ्यांवर आधारित चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली जाऊ शकत नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड आणि विपर्यास केला आहे. असे चित्रपट लोकांसमोर नेले जात आहेत. महाराज आपली अस्मिता आणि प्रेरणा आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावे आपण काहीही दाखवत आहोत. इतिहासाचा गाभा सोडता कामा नये,” अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे.

Story img Loader