राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या आईचे आज निधन झाले. कुसुमताई राजारामबापू पाटील असे त्यांचे नाव होते. आज दुपारी पावणेचारच्या दरम्यान त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्या ९६ वर्षांच्या होत्या. सांगलीचे माजी नेते आणि माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्या पत्नी कुसुमताई यांनी राजारामबापूंना साथ देत महत्त्वाची भूमिका बजावली. आता कुसुमताईंच्या निधनानंतर त्यांच्या मागे जयंत पाटील आणि भगत ही दोन मुले, एक मुलगी-जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सांगली जिल्ह्यातील कोसेगाव या ठिकाणी शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कुसुमताईंच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आणखी वाचा