लोकांना मुर्ख बनवायचे काम, एखाद्या विषयामध्ये गुंतवून ठेवण्याचे काम भाजपा सरकार करत असून आता लोकांनी सावध होवून सरकारला घालवायला सज्ज व्हावे असे आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. आज तुम्ही आम्ही मोबाईल मध्ये काय मेसेज पाठवतो हे मोदींना बघायचे आहे. हे आपल्या बेडरुम मध्ये घुसण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
नाशिकच्या समस्या ते बंद करण्यात आलेल्या कारखान्यांमुळे स्थानिक तरुणांचे रोजगार कसे बंद केले यावर भाजपवर शरसंधान साधले. या सभेत भाजप – सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याचवेळी छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री मधुकर पिचड आणि इतर नेत्यांना आसुड भेट देण्यात आले.
या सभेत महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार समीर भुजबळ यांनीही आपले विचार मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्या टप्प्यातील सभेला ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार हेमंत टकले, माजी मंत्री मधुकर पिचड , आमदार किरण पावसकर, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार समीर भुजबळ, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,माजी आमदार जयंत जाधव, नाशिक लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब पगार,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बेलकवडे आदींसह घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.