NCP MLA Disqualification Case Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा विचार करावा लागेल. अजित पवार गटाकडे ५३ पैकी ४१ आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे. तसेच दोन्ही गटाच्या याचिका फेटाळून लावताना कोणत्याही आमदाराला अपात्र न करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. त्यानंतर शरद पवार गटाकडून या निकालावर जोरदार टीका करण्यात येत आहे. “आज जरी आम्ही अपात्र झालो नसलो तरी एकंदरीत जो निकाल दिला त्यावरून कायद्याची पायमल्ली झाली, हे निश्चित आहे”, अशी टीका शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.

शरद पवार गटाला धक्का, आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना यावर टीका केली. “कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा, हे जर शिकायचं असेल तर ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिकवणी वर्ग घेऊ शकतात. एकिकडे निवडणूक आयोगाने म्हटले की, पक्षामध्ये २०१९ पासून वाद सुरू झाले. तर राहुल नार्वेकर म्हणतात २९ जून २०२३ पर्यंत वाद नव्हतेच. शरद पवारच नेते होते. ३० जून २०२३ पासून वाद निर्माण झाले. दोन्ही गटाकडून अध्यक्षपदाला आव्हान दिल्यामुळे मी पक्षसंघटनेवर भाष्य करू शकत नाही, असे ते म्हणाले. पण १ सप्टेंबर २०२२ रोजी शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. तेव्हापासून ३० जून २०२३ पर्यंत त्यांच्या अध्यक्षपदाला आव्हानच दिले गेलेले नाही. तर वाद उरतोच कुठे? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

NCP MLA Disqualification Verdict : अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष, विधानसभा अध्यक्षांचा निकाल

संविधानाच्या दहाव्या परिशिष्टाकडे मी अतिशय सूक्ष्मदृष्टीने पाहत आहे, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. दहावं परिशिष्ट हे आयाराम-गयाराम पद्धत थांबविण्यासाठी आणलं होतं. पण विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले की, हे ठरविण्याचा अधिकार माझा नाहीच. मग हे सांगण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी दीड दोन वर्ष का लावली? असाही प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

हे धृतराष्ट्र महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करतील

अजित पवार विरोधी पक्षनेते असताना त्यांनी समृद्धी महामार्गावरील एका अपघातावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. ३ जून रोजी त्यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली होती की, तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? त्यावेळी अजित पवार आपल्या शैलीत म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एकच शरद पवारच. एवढे सगळे बोलूनही जर विधानसभा अध्यक्षांना काहीही दिसत नसेल तर ते धृतराष्ट्र आहेत की काय? असे धृतराष्ट्र महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करतील, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Story img Loader