राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले आहे. कोश्यारी, त्रिवेदी यांच्या याच विधानांमुळे राज्यात संतपाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातील नेते भाजपावर कठोर शब्दांत टीका करत आहेत. राज्यपालांचा राजीनामा घ्यावा तसेच भाजपाने समस्त महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची कधीही माफी मागितलेली नाही. पुरंदरच्या तहात जेवढे किल्ले गेले होते, त्यापेक्षा दुप्पट किल्ले शिवाजी महाराज यांनी जिंकले होते, असे आव्हाड म्हणाले आहेत. ते आज (२० नोव्हेंबर) ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >>> कोश्यारींच्या विधानावर मुनगंटीवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया; बाळासाहेब ठाकरे, पवारांचं उदाहरण देत म्हणाले “त्यांनी कालबाह्य हा शब्दच…”

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!

“छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असे ते म्हणत आहेत. यांच्या बापाने यांना असा इतिहास शिकवला आहे का? शिवाजी महाराज यांच्या आयुष्यात एकच तह झाला. हा तह मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर झाला होता. त्याला पुरंदरचा तह म्हणतात. या तहातील वाटाघाटीनुसार ते औरंगजेबाच्या दरबारात गेले होते. तेथे झालेला अपमान सहन न झाल्यामुळे तहात जेवढे किल्ले गेले होते, त्यापेक्षा दुप्पट किल्ले शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडून घेतले होते. हे आहेत शिवाजी महाराज,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हेही वाचा >>> कोश्यारी, भाजपाला नाना पटोलेंचा जाहीर इशारा, म्हणाले, “माफी मागा अन्यथा…”

त्यांनी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटावरही टीका केली. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित इतिहासाची मोडतोड करण्यात आलेली आहे, असा आरोप याआधी आव्हाड यांनी केलेला आहे. “महाराष्ट्राची माती तुडवली जात आहे. लाथाडली जात आहे. असे असताना येथे बोलायला माणसं नसतील तर कठीण आहे. हर हर महादेव या चित्रपटात खोटा इतिहास सांगण्यात आला. या चित्रपटात खोटा इतिहास आहे, असे बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज म्हणाले आहेत. तो चित्रपट पाहायला कोणीही जात नाहीये. मात्र अजूनही महाराष्ट्र शासन झोपले आहे,” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच महाराष्ट्रात आता सर्वकाही चालत आहे, असे म्हणत आव्हाड यांनी खंत व्यक्त केली.

Story img Loader