राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला, असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पुरंदरे यांच्याच एका कार्यक्रमाचा दाखला देत त्यांनी विविध आरोप केले आहेत. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बाबासाहेब पुरंदरे यांचं जे विकृत लिखाण होतं, ते महाराजांची बदनामी करण्यासाठीच होतं, याच्याबद्दल महाराष्ट्रातील कुणाच्याही मनात दुमत असता कामा नये. मी त्यांच्या पुस्तकातील अनेकदा अनेक गोष्टी वाचून दाखवल्या आहेत.”

पुढे बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्यक्रमातील संदर्भ वाचून दाखवताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “१९६९-७० साली स. वा. जोशी विद्यालय, पटांगण डोंबिवली याठिकाणी शिव-व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, शिवाजी महाराज ‘गुडगी’ रोगाने वारले, हा असा रोग की ज्याबद्दल जाहीरपणे बोलणंही योग्य नाही. त्यामुळे शिवाजी महाराज गुडगी रोगानेच वारले ही कुजबूज आजही महाराष्ट्रात सुरू आहे. याचे जन्मदाते बाबासाहेब पुरंदरे आहेत” अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

हेही वाचा- …मग शरद पवार नेमके कोणते? बाबासाहेब पुरंदरेंवरील टीकेनंतर ब्राह्मण महासंघाच्या नेत्याचा बोचरा सवाल

पुढे आव्हाड म्हणाले, “पण त्यावेळी पुरंदरे यांच्याबद्दल कोण बोलणार? काय बोलणार? जोपर्यंत विरुद्ध बाजुला म्हणजे बहुजनांकडून शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक बखरींचा अभ्यासच झाला नव्हता, ऐतिहासिक संदर्भाचा कुणी अभ्यासच केला नव्हता. तोपर्यंत कादंबरीकार ब. मो. पुरंदरे (बाबासाहेब पुरंदरे) हेच इतिहासतज्ज्ञ आहेत, असं अख्ख्या महाराष्ट्राला वाटत होतं. त्यात बहुजन होते, सगळेच होते.”

हेही वाचा- पुरंदरेंएवढा अन्याय छत्रपतींवर कुणीही केला नाही; शरद पवार यांचे मत

“आता जेम्स लेन यांच्या प्रकरणानंतर बहुजनांनी त्याच्यात स्वत:चं डोकं घालायला सुरुवात केली, मग हे सगळं बाहेर आलं. महाराजांना हा गुडगी रोग कधी झाला? हा रोग काय आहे? याचा काही ऐतिहासिक दाखला आहे का? तर कुठेच नाही. पण आता महाराष्ट्रात सर्वत्र बोलतात महाराज गुडगी रोगाने वारले, पण तो कुठला गुडगी रोग? तो फक्त बाबासाहेब पुरंदरेंना माहिती आहे,” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jitendra awhad on babasaheb purandare chhatrapati shivaji maharaj gudagi disease rmm