राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या छातीत दुखत असल्याचं समोर आलं आहे. यानंतर खडसेंना तातडीनं जळगावातील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुढील उपचारासाठी खडसेंना मुंबईत हलविण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं एअर अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार एकनाथ खडसे यांना दुपारी अचानक छातीत वेदना सुरू झाल्या. यानंतर खडसेंना जळगावातील गजानन रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या रूग्णालयात खडसेंची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, पुढील उपचारासाठी खडसेंना मुंबईत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : अधिक ताण घेतल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणे आणि वाचा डॉक्टर काय सांगतात ते….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात आहेत. त्यातच, रोहिणी खडसे यांनी एअर अ‍ॅम्बुलन्ससाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी याची तातडीनं दखल घेतली. त्यांनी प्रशासनाला एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हेही वाचा : छातीत फक्त जळजळ होतेय की हार्टअटॅक आलाय? लक्षण कसे ओळखाल, फक्त डाव्या बाजूला दुखणं नव्हे तर..

खडसेंची प्रकृती स्थिर पण…

“दोन दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या छातीत वेदना होत होत्या. त्यांचा रक्तदाब स्थिर आहे. खडसेंची प्रकृती सध्या स्थिर असून पुढील उपचारासाठी बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे,” अशी माहिती हृदयरोगतज्ञ विवेक चौधरी यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader mla eknath khadse suffer heart attacks cm eknath shinde arrange air ambulance mumbai treatment ssa