लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व बाबा ग्रुपचे अध्यक्ष नालसाब मुल्ला (वय ४६) याच्या खून प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चौघांना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार बैठकीत दिली.

शनिवारी रात्री अज्ञातानी गोळीबार मुल्ला यांचा गोळीबार करुन खून केला. या खून प्रकरणी सनी सुनील कुरणे (वय.२३ रा.जयसिंगपुर ता.शिरोळ) विशाल सुरेश कोळपे (वय. २० रा.लिंबेवाडी ता.कवठेमहांकाळ) स्वप्नील संतोष मलमे (वय २०, रा.खरशिंग ता.कवठेमहांकाळ आणि एक अल्पवयीन मुलगा शा चार जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानी केली

आणखी वाचा-“औरंगजेबाची कबर फक्त उखडू नका, ती थेट समुद्रात…” गुणरत्न सदावर्तेंची टीका

शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील माने चौकातील गुलाब कॉलनीमध्ये गोळीबार व हत्त्येचा थरार घडला. मुल्ला यांचा बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बुलेटवरुन आलेल्या चौघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारचा आवाज ऐकून मुल्ला यांचे कुटुंबिय तात्काळ धावले‌. गंभीर स्थितीत जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.