माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही.

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यांना २ नोव्हेंबरपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक हे सध्या कुर्ला येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

६२ वर्षीय नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालयाने फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. दाऊद इब्राहिमशीसंबंधित मालमत्ता खरेदी करताना आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीच्या पथकाने २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर ईडीने नवाब मलिकांना ताब्यात घेत चौकशीसाठी कार्यालयात आणलं होतं. याठिकाणी सुमारे सहा तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

Story img Loader