माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. जामीन मिळाल्यानंतर आज अखेर ते क्रिटी केअर रुग्णालयातून बाहेर पडले. नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते जमा झाले होते. कार्यकर्त्यांनी नवाब मलिकांचं जंगी स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जामीन मिळाल्यानंतर सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नवाब मलिक रुग्णालयातून बाहेर पडले. आमदार मलिक रुग्णालयातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नवाब मलिक क्रिटीकेअर रुग्णालयातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी “कोण आला रे कोण आला, राष्ट्रवादीचा वाघ आला”, “नवाब मलिक तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिली. शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे महत्त्वाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येथे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही सायंकाळपासून रुग्णालयाच्या बाहेर उपस्थित होत्या.

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली होती. मागील जवळपास एक वर्षे पाच महिन्यांपासून नवाब मलिक ईडीच्या तुरुंगात होते. दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिकांना काही वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने मलिकांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे.

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अखेर दीड वर्षांनी नवाब मलिक यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. मागील काही दिवसांपासून नवाब मलिक क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेत होते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारपासूनच रुग्णालयाबाहेर गर्दी केली. नवाब मलिक रुग्णालयातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader nawab malik released from ed custody ncp workers welcomed rmm
Show comments