भारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी अलीकडेच काही ट्वीट्स केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं भाकीत त्यांनी आपल्या ट्वीटरद्वारे केलं होतं. त्यांचा बोलण्याचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होते. मोहीत कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना विधान आलं होतं. यावर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत मोहीत कंबोज यांच्यावर टीका केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहीत पवार यांनीदेखील मोहीत कंबोज यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. मोहीत कंबोज यांनी सामान्य नागरिकांचा पैसा असलेल्या दोन-तीन बँकांना चुना लावला आहे, त्यामुळे त्यांच्या ट्वीटला किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. ते बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार; मोहित कंबोज यांचं सूचक ट्वीट, सिंचन घोटाळ्याचाही केला उल्लेख

दरम्यान, मोहीत कंबोज यांनी अजित पवारांबाबत केलेल्या ट्वीटबद्दल विचारलं असता, रोहित पवार म्हणाले की, “जेव्हा त्यांनी ट्वीट केले, तेव्हाच मी मोहीत कंबोजबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओव्हरसीज बँकेत ५२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा विषय चर्चेत आहे. त्याचबरोबर त्यांनी अजून दोन-तीन बँकांना चुना लावला आहे. सामान्य लोकांचा पैसा ज्या बँकेत असतो, त्याच बँकेला त्यांनी चुना लावला असेल तर त्यांच्या ट्वीटला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे? हे आपण समजून घेतलं पाहिजे” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

हेही वाचा- “महाविकास आघाडी म्हणजे ‘नाच्याचा खेळ’, त्यात विनायक राऊत…” शहाजीबापू पाटलांची बोचरी टीका!

मोहीत कंबोज नेमकं काय म्हणाले…
मोहित कंबोज यांनी अलीकडेच काही खळबळजनक ट्वीट्स केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेते लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं त्यांनी म्हटलं आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आणखी एक ट्वीट करत कंबोज यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं की, “२०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा.” या ट्वीटमध्ये कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader rohit pawar on bjp leader mohit kamboj fraud in 3 banks including 52 crore overseas bank rmm