भाजपाने महाविकास आघाडी सत्तेत असताना शिंदे गटाला विकास की सत्तेसाठी फोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आम्हाला सांगावे गुवाहाटीला कशासाठी गेला होता. कोणते विकासाचे राजकारण मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. आपण हिंदुधर्मासाठी गेला मग राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य केलं, तेव्हा आळीमिळी गुपचिळी करून बसला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबेर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाच्या नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान, राज्यातील प्रकल्पांची पळवापळव, महागाई आणि बेरोजगारी या विरोधात आज ( १७ डिसेंबर ) महाविकास आघाडीच्या वतीने ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आलं. यासंदर्भात रुपाली पाटील यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.

हेही वाचा : “महामोर्चा निघणारच, आडवे येऊ नका!”, शिवसेनेचा शिंदे सरकारला इशारा; म्हणाले, “महाराष्ट्रात एक वाकड्या शेपटीचे…”

“भाजपाचे भा** प्रत्येक क्षेत्र बदनाम करत आहेत, तरीही मुख्यमंत्री शिंदे शांत बसले. मुख्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार स्वत:वर ईडी आणि सीबीआयची कारवाई होऊ नये, म्हणून भाजपाबरोबर गेले आहेत. हे सर्व जगजाहीर आहे. मनसेची परिस्थिती अशी झाली की काय सोडायचं आणि काय धरायचं,” असा खोचक टोला रुपाली पाटील यांनी लगावला आहे.