राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षापदी नुकत्याच विराजमान झालेल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केलं आहे. उद्या त्यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताेन त्यांनी हे आवाहन केलं आहे.

सुप्रिया सुळे ट्वीट करत म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आवाहन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्यांना माझ्याप्रती असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त होत असते. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्तही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छा मला देण्यासाठी उत्सुक आहेत याची मला जाणीव आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >> “त्यांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर…”; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपाला शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले, “खरं आहे…”

“आपणां सर्वांना मी एकच नम्र आवाहन करू इच्छिते की, शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू आदींचे वाटप करावे. या सामाजिक उपक्रमाचे फोटो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावेत, मी ते माझ्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करेन. आपला पक्ष हा नेहमीच आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपत आला आहे. आपण हा गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रमही नेहमीच्याच तत्परतेने राबवावा, माझ्यासाठी वाढदिवसाची हीच अनमोल भेट ठरेल”, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदींच्या टीकेवर शरद पवारांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर घराणेशाहीचा गंभीर आरोप केला होता. तसेच शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या, असा टोला लगावला होता. यानंतर आता शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. ते गुरुवारी (२९ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या पक्षाविषयी मत व्यक्त केलं. ते मत व्यक्त करताना त्यांनी मुलीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या असं म्हटलं. खरं आहे, माझी मुलगी स्वतःच्या कर्तुत्वावर तीनवेळा संसदेत निवडून गेली आहे. एखाद्यावेळी बापजाद्यांची पुण्याई उपयोगी पडते, पण दुसरी, तिसऱ्या निवडणुकीत ही पुण्याई उपयोगी पडत नाही,” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

Story img Loader