राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण केले आहेत. कोरोना संसर्ग हाताळणी, मंत्र्यांवरील भ्रष्ट्राचाराचे आरोप, नेत्यांमागे लागलेली राष्ट्रीय तपास संस्थांची अशी संकटे असताना महाविकास आघाडी सरकारने आपला निम्मा कार्यकाळ पूर्ण केला आहे. असे असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार का असे विचारल्यानंतर त्यांनी हे महाराष्ट्राची जनता ठरवेल; मी कसं ठरवणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राने पीक कर्जावरील व्याज परतावा परत सुरु करावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?

सुप्रिया सुळे काल (२९ मे रोजी) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील जनतेसोबत चर्चा केली. त्यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचेदेखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

हेही वाचा >> राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल होणार, शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच राज्यात चांगला पाऊस पडू दे. बळीराजाचं राज्य येऊ दे असं साकडं तुळजाभवानीकडे घातल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

हेही वाचा >> दगडूशेठ मंदिरात शरद पवारांनी दारातूनच दर्शन घेतल्यासंदर्भात विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सिद्धीविनायक मंदिरात जा आणि…”

दरम्यान, उस्मानाबाद दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे यांचा ताफा मुस्लिम सामाजाच्या काही कार्यकर्त्यांनी अडवला होता. मुस्लिम समाजाला उस्मानाबाद दौऱ्यात स्थान न दिल्यामुळे हे कार्यकर्ते नाराज झाले होते, असं सांगण्यात येत आहे. नंतर या कार्यकर्त्यांची समजूत काढल्यांतर सुप्रिया सुळे यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला होता.