आपल्याला विजयी केल्याचे सांगणाऱ्यांनी कणकवलीच्या पराभवावर बोलावे. नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आमची ताकद दाखवून दिली आहे, त्यामुळे राणोंना लोकसभा निवडणुकीत मदत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर केले आहे.
दहशतवादी प्रवृत्तीविरोधात माझा लढा सुरूच आहे. यदाकदाचित उमेदवार नसलो तरी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांचा प्रचार करणार नाही याबाबत पक्षश्रेष्ठींचा पक्षादेशही पाळणार नाही या मतावर ठाम असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.
पालकमंत्री नारायण राणे यांनी कायमच श्रेय मिळविण्याचा प्रयत्न केला. लोकांची आंदोलने चिरडून टाकण्यासाठी पुढाकार घेतला, पण आम्ही लोकांसोबत आहोत. वेंगुर्ले भुयारी गटार योजना वेंगुर्लेवासीयांना नको आहे. त्यांनी अभ्यास समिती नेमण्यासाठी पुढाकार घेतला आहे, पण पालकमंत्री मात्र दिशाभूल करत आहेत असे आमदार दीपक केसरकर म्हणाले.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर पालकमंत्री नारायण राणे यांनी टीका केली. मंत्रिपद मिळाल्यानंतर आर. आर. पाटील यांनी धडाडीचे निर्णय घेऊन अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही, असे आम. दीपक केसरकर म्हणाले.
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा घोषित झाल्यानंतर एकाच वर्षी शासकीय पर्यटन महोत्सव भरविण्यात आला, पण त्यानंतर पालकमंत्री नारायण राणे यांनी हा महोत्सव दरवर्षी भरविण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले नाहीत, अशी टीका दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी किनारपट्टी भागात आणण्यासाठी योजना आखावी म्हणून मीच प्रयत्न केले. त्यामुळे विरोध करण्याचा प्रश्नच नाही. मात्र राणे यांनी श्रेय घेण्यासाठी धडपड केली आहे.
दहशतवादी प्रवृत्तीविरोधात माझा लढा सुरूच आहे. यदाकदाचित उमेदवार नसलो तरी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांचा प्रचार करणार नाही याबाबत पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळणार नाही