Hasan Mushrif On Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभेची निवडणूक पुढच्या दोन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरु केली आहे. सध्या राजकीय नेतेमंडळी विविध मतदारसंघाचा दौरा करत कामाचा आढावा घेत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. मात्र, काही मतदारसंघात तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं भाष्य केलं आहे. “तिरंगी, चौरंगी कशीही लढत होऊ द्या, पण मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार”, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडीही स्थापन होण्याच्या चर्चांवरही भाष्य केलं आहे.

Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Ashish Shelar on Vote Jihad
Vote Jihad: “एक ऐसा व्होट जिहाद…”, सज्जाद नोमानी यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत आशिष शेलारांची मविआवर टीका
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
devendra fadnavis remark on vote jihad in mumbai
‘व्होट जिहाद’विरोधात ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी

हेही वाचा : Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“निवडणुकीच्या तोंडावर समाजामध्ये तेढ निर्माण करणं योग्य नाही. प्रत्येकाने आपल्या भाषेवर संयम ठेवला पाहिजे. ज्या पद्धतीने काही मंडळी बोलत आहेत, ते खेदजनक आहे. पण समाजामध्ये तेढ वाढवायचा नसेल तर संयम ठेवणं गरजेचं आहे”, असं मुश्रीफ यांनी म्हटलं.

तिसऱ्या आघाडीबाबत मुश्रीफ काय म्हणाले?

“मी याआधीही सांगितलं होतं की यावेळी बहुरंगी लढती होतील. आता कोणीही थांबायला तयार नाही. कारण ८ ते १० पक्ष झाले आहेत. मग तिसरी आघाडी होईल किंवा चौथी आघाडी होईल. आता या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारच उमेदवार उभे राहतील. बच्चू कडू यांचे दोन आमदार आहेत. एक ते स्वत: आणि त्याचे अजून एक आमदार आहेत. मात्र, बच्चू कडू यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते तिसरी आघाडी करु शकतात”, असं मुश्रीफ म्हणाले.

मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात…

समरजीत घाटगे यांना शरद पवार गटाकडून संपर्क साधल्याची चर्चा आहे. या प्रश्नावर हसन मुश्रीफ म्हणाले, “हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. मला विचारुन काही उपयोग नाही. माझं ठरलेलं आहे की अजित पवार गट, आता माझा प्रचारही सुरु झालेला आहे. माझ्या विरोधात कोण उमेदवार असेल मी याची चिंता करत नाही. एकूण सहा निवडणुकीत तिरंगी लढत फक्त दोन वेळा झाली आणि चार वेळा एकास एक अशीच लढत झालेली आहे. यावेळीही एकास एक किंवा तिरंगी चौरंगी कशीही लढत होऊ द्या, पण मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार”, असं सूचक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.