कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांचा पराभव केला. संजय मंडलिक यांच्या पराभवानंतर महायुतीच्या नेत्यांनी बैठक घेत पराभवाची कारणमीमांसा केली. तसेच पराभवाची कारणं सांगत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विशेष ती काळजी घेण्यात येईल, असं कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

“शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांना जवळपास ६ लाख मते पडली आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांना दिलेल्या मतदारांचे आभार मानायला पाहिजे. देशातील एकूण परिस्थिती पाहिली असता कोल्हापूर जिल्ह्यात काही पडझड झाली. कोल्हापूरमध्ये महायुतीची एक जागा निवडून आणण्यात आम्हाला यश आलं. मात्र, कोल्हापूरची जागा आम्ही निवडून आणू शकलो नाहीत. त्याला अनेक कारणे आहेत”, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : संजय राऊत यांचा मोठा दावा! “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मविआ ‘इतक्या’ जागा जिंकणार”

हसन मुश्रीफ यांनी म्हटलं की, “संजय मंडलिक यांचा पराभव झाला, त्याला अनेक कारणं आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी असणं, मराठा आरक्षणाचा प्रश्न, कांदा प्रश्न, त्यानंतर आमचा एक शक्ती मार्ग गेला, यासह आदी कारणं या पराभवाला कारणीभूत ठरली आहेत. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही कारणमीमांसा करू आणि असे होऊ नये, यासाठी योग्य तो निर्णय घेऊ”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

‘हा’ माझ्यासाठी धक्का

“महायुतीचे उमेदावर संजय मंडलिक यांना कागल विधानसभा मतदारसंघात १५ हजार मताधिक्य आम्ही राखलं. पण कागल विधानसभा मतदारसंघातून आम्हाला ७० ते ८० हजार मताधिक्य मिळ्याची आवश्यकता होती. असीच अडचण आणखी काही ठिकाणी झाली. संजय मंडलीक निवडून येतील असं आम्हाला वाटत होतं. मात्र, त्यांचा पराभव झाला हा माझ्यासाठी धक्का आहे”, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.