राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहे. परिणामी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. “नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा, अन्यथा वाटीभर उडी मारुन जीव द्या”, असा टोला मिटकरींनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “बाळासाहेब त्यांचे वडील असले तरी त्यांच्यापेक्षा जास्त आमचा अधिकार आहे त्यांच्यावर”; उद्धव ठाकरेंना मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर होण्यास विलंब

अकोल्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४५० एकर भागातील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्यामुळे कोणताही मंत्री नुकसान ग्रस्त भागांची पहाणी करण्यासाठी येऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर होण्यास विलंब लागत आहे. परिणामी हवालदिल झालेला शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, असा टोला मिटकरींनी राज्य सरकारला लगावला आहे.

हेही वाचा- चांगभलं : आपत्तीत मदतीसाठी लेखापरीक्षक महिलेचा पुढाकार, यांत्रिक नौका चालवण्याचे कौशल्य आत्मसात

शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी राज्यसरकारकडे वेळ नाही

आत्तापर्यंत ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जिल्ह्याला अजून पालकमंत्री मिळाला नाही. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे राज्याला कृषी मंत्री मिळाला नाही. देवेंद्र फडणवीसांनी आमच्या काळात शेतकरी आत्महत्या होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. गुवाहाटीला, दिल्लीला, सूरतला जाण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. मात्र, शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी राज्यसरकारकडे वेळ नसल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla amol mitkari criticize shinde fadnavis government on farmer suicide dpj