राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर आज (रविवार) झालेल्या बैठकीनंतर आमदार दीपक केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आज सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण संयुक्त सभा घेण्यापूर्वीच दीपक केसरकरांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे. तसेच, नारायण राणेंसोबत सुरू असलेला वाद उफाळून आला आहे.
दहशतवादविरोधात व जिल्ह्यातील शांततेसाठी मी आमदारकीचा राजीनामा दिला असून आज मी आघाडीच्या मंचावर गेलो असतो तर जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला असता असे केसरकर यांनी राजीनाम्यानंतर सांगितले. मला शरद पवारांविषयी आदर असून माझ्यामुळे राष्ट्रवादीला कोणाची बोलणी ऐकावी लागू नये यासाठी मी राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader