राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यात अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्रच तयार असल्याचं वृ्त्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी अजित पवार जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असल्याचं सांगून चर्चेत आणखीन तेल ओतलं असताना दुसऱ्या बाजूला काही आमदार मात्र आपण कुठेही सह्या केलेल्या नसल्याचा दावा करताना दिसत आहेत.

नेमकं घडलं काय?

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार राज्य सरकारला पाठिंबा जाहीर करणार असल्याची जोरदार चर्चा चालू होती. त्यात या नव्या वृत्तामुळे अजित पवारांच्या भावी राजकीय वाटचालीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. खुद्द अजित पवार यांनी यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे, नितीन पवार, कोकाटे अशा काही आमदारांनी अजित पवार जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, अशा आशयाची विधानं करून चर्चेची नवी राळ उडवून दिली आहे. मात्र, दुसरीकडे पुण्यातील खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मात्र कुणी कुठेही सह्या केल्या नसल्याचं विधान केलं आहे.

devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
jayant patil Sarcastic speech to rular party on last day of Winter session of the legislature
एक मुख्यमंत्रीही काफी है! इतरांची गरज नाही, जयंत पाटलांची टोलेबाजी
Ajit Pawar On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “मास्टरमाईंड कोणी असो, त्याला सोडणार नाही”, अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन

“माझ्याकडे पक्की माहिती आहे की…”, संजय राऊतांचा अजित पवारांबाबत दावा; म्हणाले, “आज सकाळी आम्ही…!”

काय म्हणाले दिलीप मोहिते पाटील?

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी टीव्ही ९ ला प्रतिक्रिया देताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही सगळेच आमदार अजित पवार, शरद पवार यांच्या जवळचे आहोत. आम्ही सगळे परवा शरद पवारांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलो होतो. यावेळी शरद पवारांनी असे कोणत्याही प्रकारचे सूतोवाच आम्हाला केलेले नाहीत. त्यानिमित्ताने मी, अतुल बेनके, सुनील, चेतन तुपे असे आम्ही सगळे व्यासपीठावर होतो. आजपर्यंत आम्ही कुणीही कुठे सह्या केलेल्या नाहीत. कुणीही कुठेही गेलेलं नाही. अजित पवारांनी कुणालाही बोलावलेलं नाही. या चर्चा का करतात? यात कुणाला काय साधायचंय? की हा राजकीय स्टंट आहे? याची आम्हाला कुणालाही कल्पना नाही”, असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले आहेत.

“माझं राजकीय जीवन शरद पवार आणि अजित पवारांमुळे घडलंय. मी पवार कुटुंबासोबतच शेवटपर्यंत राहणार नाही. शरद पवारांचं वय ८३ वर्षं आहेत. आपण का त्यांच्या कुटुंबात गट पाडताय? ज्यांनी आयुष्यभर कुटुंबाला सोबत घेऊन राजकारण केलंय, अजित पवारांनी सातत्याने सांगितलंय की शरद पवार आपले दैवत आहेत, असं असताना पक्षात कोणता गट राहील असं वाटत नाही. जेव्हा तशी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा मी सांगेनच”, असंही मोहिते पाटील म्हणाले.

महाराष्ट्र नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर? राष्ट्रवादीच्या काही आमदारांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा”; म्हणाले, “ते जो निर्णय घेतील…!”

“अजित पवार जातील असं वाटत नाही”

दरम्यान, काहीशी याच प्रकारची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनी दिली आहे. “आम्ही सर्वजण मिळून शरद पवार यांच्याबरोबर आहोत आणि मिळून राहू. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वडिल, मुलाचं नात आहे. सुप्रिया सुळे, जयंत पाटील जितेंद्र आव्हाड हा आमचा परिवार आहे. त्यामुळे अजित पवार जातील असं वाटत नाही. भाजपा अजित पवारांना गळाला लावत आहे, हे सुद्धा वाटत नाही. लोकांच्या मागण्या, जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न यासाठी अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात”, असं सुनील भुसारा म्हणाले.

Story img Loader