विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद हे आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गेलं आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. विधानसभेचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार? याची चर्चा चांगलीच रंगली होती. ज्यानंतर आता हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे.

दिलीप वळसे पाटील हंगामी अध्यक्ष झाले आहेत. उद्या सकाळी कामकाज सुरु झाल्यावर होणार घोषणा केली जाणार त्यानंतर मंत्र्यांचा परिचय होणार. परियचानंतर विरोधी पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस नेमणूक केली जाणार त्यानंतर बहुमत चाचणी होणार आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी पदभार स्वीकारला. मंत्रालयात त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. त्याच दरम्यान दिलीप वळसे पाटील यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली.

Story img Loader