राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात कधीही दंगली घडू शकतात, असं वातावरण तयार केलं जातंय. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. गावागावांत दंगली पेटल्या तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. यावर गांभीर्याने विचार करायला हवा, असं विधान आव्हाडांनी केलं. ते विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते.

विरोधी पक्षातील आमदारांना सदनात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत आव्हाड म्हणाले, “२००९ ते २०१४ या काळात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे होते. त्यांच्यामागे देवेंद्र फडणवीस बसायचे. ते दोघं मिळून तीन-तीन तास बोलायचे. हवं तर तुम्ही रेकॉर्ड तपासून बघू शकता. ते दोघं ज्या-ज्या वेळी उभं राहायचे तेव्हा त्यांना बोलायला संधी दिली जायची. कारण तेव्हाचे अध्यक्ष लिबरल होते.”

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, “राहुल गांधी संविधान बचाओच्या घोषणा करतात पण त्यांच्या हातातल्या लाल पुस्तकात..”

“सध्या महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती ही चिंतेची बाब आहे. या महाराष्ट्रात कधीही दंगली घडू शकतात, असं वातावरण तयार केलं जातंय, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. गावांगावांत दंगली पेटल्या तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र उद्धवस्त होईल. यावर गांभीर्याने विचार करायला हवा. महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बिघडवायची, जेणेकरून मतदानात फरक पडेल आणि आपलं राज्य पुन्हा येईल. हे राज्य आणताना तुम्ही काय केलं? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. कसे दोन पक्ष फोडले, हे आख्या महाराष्ट्राला माहीत आहे,” अशा शब्दांत आव्हाडांनी सरकारवर टीकास्र सोडलं.

हेही वाचा- लोकसभेच्या आणखी दोन खासदारांचं निलंबन; फलक घेऊन सदनात प्रवेश केल्याने कारवाई

“अध्यक्ष महोदय, ही पद्धत आहे का? लोकशाहीची हत्या करून पक्ष फोडून राज्यव्यवस्था चालवायची नसते. सध्याच्या घडीला संसदेतील १५२ खासदार बाहेर आहेत. इथे तुम्ही आम्हाला बोलू देत नाहीत. त्यामुळे देशात लोकशाही टिकणार आहे की नाही? हा प्रश्न आहे. लोकशाही टिकवायची असेल तर समोरच्याला (विरोधी पक्षाला) सांभाळून घेण्याची पद्धत आपली आहे. याचं उदाहरण म्हणजे ज्यादिवशी राजीव गांधींना समजलं की अटल बिहारी वाजपेयींना त्रास होतोय आणि त्यांचं ऑपरेशन अमेरिकेत केलं पाहिजे. तेव्हा एक मंडळ अमेरिकेला चाललं होतं. राजीव गांधींनी त्या मंडळाचं प्रमुख अटल बिहारी वाजपेयींना केलं आणि स्वखर्चाने त्यांना अमेरिकेला पाठवलं. हे सगळं करत असताना राजीव गांधींनी वाजपेयींना विचारलं, तेव्हा वाजपेयी म्हणाले की अमेरिकेत जाऊन उपचार घेण्याइतके पैसे माझ्याकडे नाहीत. हे ऐकून राजीव गांधींनी वाजपेयींना अमेरिकेला पाठवलं आणि तिथला सर्व औषधोपचाराचा खर्च सरकारी पैशातून केला. अशी आपली लोकशाही आहे. पण विरोधकांना संपवूनच टाकायचं, चिरडूनच टाकायचं, त्यांचा निधी आडवायचा, धमक्या द्यायच्या, हे बरोबर आहे का?” असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला.