भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर विरोधकांकडून किरीट सोमय्या यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. व्यक्तिगत हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे, ह्या प्रकाराचा मी निषेध करतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. व्यक्तिगत हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं व्यक्तिगत जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. व्यक्तिगतरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे व्यक्तिगत जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.”
“एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उद्ध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, ३०-४० वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला ५ मिनिटांत उद्ध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.
हेही वाचा : “ठाणे महापालिकेचे बादशाह, माझ्या…”, जितेंद्र आव्हाड विधानसभेत संतापले; नेमकं झालं काय?
“मी १९९५ साली शरद पवार यांच्याकडे भाजपाच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार यांना मी सांगितले की, ह्या सातबाऱ्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. शरद पवारांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले ‘जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.