Rajendra Shingne on Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक तोंडावर आल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. सध्या नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून विविध मतदारसंघात सभा, मेळावे आणि आढावा बैठका घेतल्या जात आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलेलं आहे.

अशातच काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांकडून एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचा दावाही केला आहे. असं असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी मोठं विधान केलं आहे. “मी अजित पवार यांच्याबरोबर नाईलाजाने गेलो”, असं राजेंद्र शिंगणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. याचवेळी राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांचंही तोंडभरुन कौतुक करत आजही मी शरद पवारांना नेता मानतो, असंही म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Ajit Pawar on Ramraje Naik Nimbalkar
Ajit Pawar : “…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांचा रामराजे निंबाळकरांना इशारा; म्हणाले, “धमक असेल तर…”
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

हेही वाचा : CM Eknath Shinde : “…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान

राजेंद्र शिंगणे काय म्हणाले?

“गेली अनेक वर्षे मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये देखील शरद पवार यांचा मोठा मोलाचा वाटा असल्याचंही मी मान्य करतो. त्यामुळे मी आयुष्यभर निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात आमच्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर आज राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटी रुपये दिले. परंतु निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील”, असं आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

आमदार शिंगणे पुढे म्हणाले की, “मी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सहभागी झालो असलो तरी गेल्या दोन ते अडीच वर्षांत शरद पवार यांच्याबरोबरील संबंध तोडले असा काही भाग नाही. आजही मी शरद पवार यांना नेता मानतो. गेल्या दोन वर्षांत जाहीर भाषणात असेल किंवा वैयक्तिक बोलतानाही शरद पवार यांचं नाव मी राज्यातील मोठे नेते आणि लोकनेते असंच घेत आलो. भविष्यात देखील शरद पवार यांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे”, असंही राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांची साथ सोडणार का?

राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनीही अजित पवारांची साथ दिली. राजेंद्र शिंगणे हे सध्याही अजित पवार गटात आहेत. मात्र, आज त्यांनी केलेल्या विधानंतर ते अजित पवारांची साथ सोडणार का? याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.