अहमदनगरचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएमच्या मतमोजणीवर संशय व्यक्त करत ४० मतदान केंद्रात पुन्हा मतमोजणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. विखेंनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी टोला लगावला आहे. माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, आपला पराजय होईल, असे सुजय विखे यांना वाटले नव्हते. भाजपचे नेते सांगतात ईव्हीएमवर शंका घेऊ नये. त्यामुळे सुजय विखे पाटील हे आता भाजपाच्या नेत्याच्या विरोधात जातात काय? असे चित्र दिसत आहे.

ईव्हीएमवर बोलत असताना रोहित पवार यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील वादावरही भाष्य केले. “मतमोजणी केंद्रावर निवडणूक आयोगाकडून निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. त्यांच्याकडून मतमोजणीदरम्यान नक्कीच आकड्यांचा खेळ होऊ शकतो. उत्तर पश्चिम लोकसभेत उबाठा गटाचे अमोल किर्तीकर यांना सुरुवातीला विजयी घोषित केले होते. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांना कुणाचा तरी फोन आला आणि नंतर आकडे बदलले, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

Nitin Gadkari question is why caste is considered in elections
निवडणुकीतच जातीचा विचार का; नितीन गडकरी यांचा प्रश्न
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
yek number actor vishal sudarshanwar plays raj thackeray role
“तेव्हा समोर स्वत: राजसाहेब बसले होते…”, ‘येक नंबर’मध्ये मनसे अध्यक्षांची भूमिका कोणी साकारलीये? अभिनेता म्हणाला…
Supriya Sule criticizes Mahayuti over Uddhav Thackeray bag checking case Pune news
उद्धव ठाकरे यांच्या बॅग चेक प्रकरणावर सुप्रिया सुळे यांच मोठ विधान…..
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच

ईव्हीएम मशीनवरून अमेरिकेतही वादावादी; एलॉन मस्क यांनीही केली टीका

ईव्हीएमच्या पडताळणीसाठी एलॉन मस्कची मदत घ्या

पत्रकार परिषेदत बोलत असताना रोहित पवार म्हणाले की, उत्तर पश्चिम लोकसभेच्या मतमोजणी केंद्रावरील निवडणूक अधिकारी बराच वेळ फोनवर बोलत होत्या, असा आरोप करण्यात येत आहे. ईव्हीएमची चर्चा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत असेल तर केंद्र सरकारने सर्व विरोधी पक्षांना घेऊन ईव्हीएमची चिरफाड केली पाहीजे. विरोधक आणि निवडणूक आयोगाने आपापले तज्ज्ञ घेऊन ईव्हीएमची तपासणी केली पाहीजे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि एआय व रोबोटीक्स क्षेत्रात प्रख्यात असलेल्या एलॉन मस्क यांचीही मदत घेण्यात यावी. मस्क यांचेही तज्ज्ञ बोलावून घेण्यात यावेत, जेणेकरून ईव्हीएमची चिरफाड करत खरं-खोटं समोर येईल. तसेच मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल केस स्टडी म्हणून पाहता येईल.

एलॉन मस्क हे जगातील एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी एखादी भूमिका मांडल्यानंतर त्यावर जगभरात चर्चा होते. एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी एक्स या सोशल मीडियावरून ईव्हीएमवर पोस्ट केली होती. अमेरिकेच्या निवडणुकीतील स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांच्या एका पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी ईव्हीएमच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.