राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वयानुसार राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करावा, अशा आशयाची जाहीर टीका अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी केली होती. ५ जुलै रोजी झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीत त्यांनी ही टीका केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या वयाचा मुद्दा गेल्या महिन्याभरापासून चर्चेचा विषय ठरला आहे. त्यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक ट्वीट केलं आहे. तसेच, त्यांनी ट्वीटमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचाही उल्लेख केला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

“आता नवी पिढी पुढे येते आहे. तुम्ही आशीर्वाद द्या ना.. चुकलं तर सांगा की अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करुन दुरुस्त करुन पुढे जाऊ. पण हे कुणासाठी चाललं आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? आता जर वय जास्त झालं, ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का?” असा थेट सवालच अजित पवारांनी उपस्थित केला होता.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; भाषणात म्हणाले, “दीड वर्षांनी ते…”!
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Ajit Pawar
Ajit Pawar : योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’शी अजित पवार सहमत? म्हणाले, “तडजोडी…”
ajit-pawar on sharad pawar
Ajit Pawar on Sharad Pawar : “ते ८५ वर्षांचे अन् मला रिटायर करायला निघालेत”, अजित पवारांची शरद पवारांवर टीका

वयावर चर्चा, पण पवारांचा निर्धार कायम!

दरम्यान, अजित पवारांच्या या टीकेवर शरद पवारांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं. “काहीजण बोलले तुमचं वय झालं, तुम्ही आता निवृत्त व्हा. खरंतर वय झालंय हे खरं आहे. वय ८२ झालंय हेसुद्धा खरं आहे. पण हा गडी काय आहे हे तुम्ही पाहिलंय कुठं. जास्त सांगायची गरज नाही. उगीच वया-बियाच्या भानगडीत पडू नका. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल”, असं शरद पवार म्हणाले होते. तसेच, “मी कुठेही थांबण्याचा प्रश्नच येत नाही. मी आता आणखी जोमाने काम करणार आहे. वय ८२ होऊ द्या किंवा ९२ होऊ द्या”, असंही ते म्हणाले होते.

‘त्या’ व्हिडिओवर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांना केली विनंती…

रोहित पवारांनी करून दिली आठवण!

दरम्यान, यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये रोहित पवारांनी वयाबाबत झालेल्या चर्चेची आठवण करून दिली आहे. “गेल्या काही दिवसांपासून वय या विषयावर खूप चर्चा झाली. पण वय कमी असो किंवा जास्त काम करण्यासाठी वय कधीही मॅटर करत नाही, ही माझी ठाम भूमिका आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपद तरुण नेत्याकडे?

सध्या रिक्त असणारं विधानसभा विरोधी पक्षनेतेपद तरुण नेत्याकडे दिलं जावं, अशी इच्छा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. “युवांना कुणीही कमी समजू नये, त्यांना संधी मिळाली पाहिजे. माझी तर काँग्रेस पक्षालाही विनंती राहील की, त्यांच्याकडेही मोठी क्षमता असलेले अनेक युवा आमदार आहेत. त्यापैकी एखाद्याला विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद मिळालं तर तेही निश्चित कर्तृत्व दाखवतील, असा विश्वास आहे”, असं रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.