मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून उपोषण करण्यासाठी बसले आहेत. सरकार त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न हर तऱ्हेने करतं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलेलं नाही. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी रोखठोक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी सलाईनही काढून टाकलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना माता-भगिनींनी जी विनंती केली त्यानंतर त्यांनी सलाईन लावलं आहे. आज दुपारपर्यंत ते भूमिका मांडणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी?

मनोज जरांगे पाटील अत्यंत तळमळीने, जिद्दीने उपोषण करत आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याचे त्यांच्या आवाजावरून जाणवत आहे. तसेच त्यांची एक किडनी सुद्धा काम करत नाही. परिणामी उपोषण सुरु ठेवणे मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.

आरक्षणाचा लढा कायम राहीलच, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या खऱ्या आणि निस्वार्थी हिऱ्याचे आरोग्य धोक्यात आले तर समाजाचे खूप मोठे नुकसान होईल. त्यामुळे तूर्तास तरी समाजाचा व कुटुंबाचा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यायला हवे. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, कौटुंबिक-मित्र परिवारासह सर्वांनीच उपोषण सोडण्यासाठी त्यांना साद घालावी ही कळकळीची विनंती.

मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी सर्व पक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असल्याने ही तातडीची बैठक घेतली आहे. त्यांची काळजी आम्हाला सर्वांना आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.