कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची पीछेहाट झाल्यानंतर देशभर हे निकाल चर्चेचा विषय ठरले आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर कर्नाटकात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून काँग्रेसवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या मविआच्या नेत्यांवर खोचक टीका करण्यात आल्यानंतर त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टोला लगावला आहे.

“लोक बदल करत असतात. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर निकाल देण्यासाठी नऊ महिने गेले. जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने सत्ताबदलाची संधी लोकांना दिली जाते, तेव्हा ते लोकशाहीच्या बाजूनेच निर्णय देत असतात. हे कर्नाटकमध्ये दिसलं. महाराष्ट्रातही सामान्य लोक हे निकाल भाजपाच्या विरोधात देतील. कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. खोट्या बातम्या पेरल्या गेल्या. पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. पण त्याला यश आलं नाही. तिथे जे घडलं, ते प्रत्येक राज्यात घडेल”, असं रोहित पवार म्हणाले.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

“फुटलेल्या गटात अस्वस्थता”

“महाराष्ट्र भाजपामध्येही या निकालानंतर अस्वस्थता आहे. शिवसेनेतून फुटलेल्या गटातही अस्वस्थता आहे. २०२४मध्ये लोकसभा आणि विधानसभेत लोक भाजपाच्या विरोधात निकाल देतील”, असा विश्वास रोहित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

“विजय मिळाला असता तर श्रेय मोदींनी घेतले असते, पण पराभवाचे मडके…’ कर्नाटक निकालावरून ठाकरे गटाची भाजपावर टीका

मुख्यमंत्र्यांना टोला

“मूल जन्मलं एका ठिकाणी, बारसं दुसऱ्या ठिकाणी” अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर त्यावरून रोहित पवारांनी टोला लगावला आहे. “अनेक मोठे नेते कर्नाटकात गेले होते. महाराष्ट्रातल्याही मोठ्या नेत्यांनी तिथे प्रचार केला. तरीही भाजपा हरते. हा एक मोठा संदेश आहे. एवढी ताकद लावूनही कर्नाटकात लोकांनी काँग्रेसच्या बाजूने निकाल दिला हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाळणा कुठे, बारसं कुठे? असं बोलण्यात अर्थ नाही. पाळणा हलवायला तुम्हीही गेला होतात ना तिथे? फक्त तो तुमचा नाही हलला, लोकांनी लोकशाहीचा हलवला. त्यामुळे उगाच शब्दांत खेळू नका. महाराष्ट्रातली जनता एवढी सोपी-साधी नाही. संतांच्या आणि थोर व्यक्तींच्या विचारांनी त्यांची बुद्धी चांगली झाली आहे. योग्य निर्णय ते देतील. उगाच गंडवण्याचा प्रयत्न करू नका”, असंही रोहित पवार म्हणाले.

अमोल कोल्हेंच्या महानाट्याचा प्रयोग बंद पाडला?

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अमोल कोल्हेंच्या महानाट्याचा प्रयोग बंद पाडल्याचा आरोप पोलीस प्रशासनावर केला जात आहे. त्यासंदर्भात रोहित पवारांनी भूमिका मांडली आहे. “काही पोलिसांनी पैसे मागितले. छत्रपती संभाजीराजेंचा कार्यक्रम होत असताना पोलिसांनी पैसे मागितले. पोलीस प्रशासन, कोणत्याही महानगर पालिका, जिल्हा परिषदेत तिथले काही अधिकारी वेगळ्या पद्धतीने सामान्य लोकांकडे पैशांची मागणी करत आहेत. मंत्रीही काही कमी नाही. कर्नाटकात ४० टक्क्यांचा आकडा होता. महाराष्ट्रात तो २० टक्क्यांचा नक्कीच असेल. निवडणुकाच होत नाहीत. त्यामुळे सामान्य लोकांनी दाद मागायची कुठे? अधिकाऱ्यांकडे जाऊन बसायचं का?” असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader