एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागलं. बंडखोर आमदारांशी परत येण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र, आमदारांनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. त्यामुळे उद्धव ठाकरे हे बंड थोपवण्यात अपयशी ठरले का? यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित पवार म्हणाले की, “शिवसेनेत आमदार फुटल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना पक्षातील बंड थोपवण्यात अपयश आलं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे होते. मात्र, बंडखोरी केलेले ४० आमदार परत येतील, असा विश्वास होता. बंड करण्याची तयारी एक, दोन महिन्यापूर्वी नाहीतर, एक ते दीड वर्षापासून सुरु होती. याची जाणीव सर्वांना होती. पण, बंडखोरीनंतर १० ते ११ आमदार फुटतील, असे वाटलं होतं.”

हेही वाचा : “शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा डाव,” रोहित पवारांचा मोठा दावा, म्हणाले “पवार कुटुंबात मतभेद…”

“ते पाहून पूर्वीची राजकीय…”

“उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना भेटू शकलो नाही. अन्यथा मी आदित्य आणि उद्धव ठाकरेंना भेटून बैठका करत होतो. नुकतेच एका मंत्र्याला भेटायला कामानिमित्त भेटण्यास गेलो होते. तेव्हा त्यांच्या कार्यालयाबाहेर २० आमदार उभे राहिले होते. ते पाहून पूर्वीची राजकीय स्थिती चांगली होती,” असेही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla rohit pawar on shivsena rebel mlas uddhav thackeray ssa
Show comments