बारामती अॅग्रो साखर कारखान्याच्या गाळप हंगामावरून बाजपा नेते राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये गेल्याच आठवड्यात जोरदार कलगीतुरा रंगला होता. राम शिंदेंनी कारवाईची मागणी केल्यानंतर रोहित पवारांनी हे लहान मुलांनी चॉकलेटसाठी रडण्यासारखं आहे, असं म्हणत खोचक टोला लगावला होता. आता पुन्हा एकदा रोहित पवार आणि राम कदम यांच्यामध्ये जुंपली आहे. यंदा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावरून या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. राम शिंदेंनी यांसदर्भात केलेल्या दाव्यावर रोहित पवारांनी खोचक शब्दांत प्रत्यु्त्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले होते राम शिंदे?

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी राम शिंदे यांचं एक विधान दिलं आहे. “माझ्या मतदारसंघात येऊ नका म्हणून आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना दहा फोन केले”, असं राम शिंदे म्हणाल्याचं रोहित पवार यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, राम शिंदेंच्या या दाव्यावर रोहित पवारांनी टोला लगावला आहे. त्यांचं हे विधान लिहून त्याखाली रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांना लक्ष्य करत प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्याला पैसा आणि अहंकाराची खाज आहे. ज्याला हाफकिन संस्था आहे की व्यक्ती हेही माहिती नाही, जो महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो, अशा व्यक्तीला मतदारसंघात न येण्यााठी मी कशाला मस्का लावू?” असा सवाल रोहित पवारांनी या ट्वीटमध्ये केला आहे.

“हिंमत असेल तर…”

“राम शिंदे साहेब, पु्ड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत. हिंमत असेल, तर याचा पुरावा द्या आणि यापुढे तुमच्याच प्रचाराला त्यांना जरूर बोलवा. मग मैदानात बघू”, असं आव्हानही रोहित पवारांनी दिलं आहे.