तीन वर्षांनंतर दापोलीत गुरुवारी आमसभेचे नियोजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दापोलीत ‘शिवसेना आपल्या दारी’ने ढवळलेले राजकीय वातावरण आता राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्या आमसभेने आणखी तापणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. दापोली पंचायत समितीत झालेल्या सत्तापरिवर्तनामुळे गेली तीन वष्रे स्थगित असलेल्या आमसभेला यंदा राजकीय मुहूर्त सापडला आहे. साहजिकच कारकीर्दीतील ही पहिलीच आमसभा कदम यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची ठरणार असून, यानिमित्ताने सभागृहात ‘हाऊसफुल् ल’ गर्दी होण्याची शक्यता आहे. शहरातील राधाकृष्ण मंदिर सभागृहात सकाळी ११ वाजता ही बहुप्रतीक्षित आमसभा होणार आहे.

राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दापोलीत जोरदार तयारी सुरू केली आहे. दापोली पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता आल्याने त्यांच्या राजकीय मोहिमेत अडथळा निर्माण झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच रामदास कदम यांनी संजय कदम यांच्यावर टीकेच्या तोफा डागण्यास सुरुवात केली होती, पण त्याचा फारसा परिणाम दापोलीत जाणवला नसल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. दापोली पंचायत समितीत आतापर्यंत शिवसेनेची सत्ता असल्याने गेली तीन वष्रे आमदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आमसभेचे नियोजन स्थगित करण्यात येत होते. मात्र यंदा सत्तापरिवर्तन झाल्याने पंचायत समितीतर्फे ११ मे रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले.

साहजिकच या आमसभेपूर्वी तालुक्यात शिवसेनेची वातावरणनिर्मिती व्हावी, यादृष्टीने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी लगबगीने ‘शिवसेना आपल्या दारी’चा उपक्रम हाती घेतला. गावागावांत पर्यावरणमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर तेच प्रश्न आमसभेतही हाताळले जाण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे. मात्र स्थानिक आमदार म्हणून शासकीय यंत्रणेला दिलेल्या सूचना महत्त्वाच्या, की मंत्र्यांनी दिलेले आश्वासन महत्त्वाचे, या अहमहमिकेच्या राजकारणाला आता दापोलीत खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. दरम्यान, आमदार कदम यांच्या आक्रमक पवित्र्याबाबत विरोधकांनी यापूर्वीच सरकारी यंत्रणांमध्ये घबराट पसरवली आहे. साहजिकच कारकीर्दीतील ही पहिलीच आमसभा आमदार कदम कशी हाताळणार, याकडे सर्वाचे आता लक्ष लागले आहे.