खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत फसवणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीला मदत करणार नाही, असे विधान करून आक्रमक पवित्रा घेणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगत खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी निवडणुकीसाठी जुळवून घेण्याची तयारी दर्शवली आहे.

पक्षनेते शरद पवार यांनी आदेश दिला तर सतेज पाटील यांची भेट घेणार आहे, असे स्पष्टीकरण करतानाच महाडिक यांनी सतेज पाटील यांच्याशी मैत्री असल्याची आठवणही करून दिली.

महाडिक यांनी टाळीसाठी हात पुढे केला असताना त्याला पाटील यांच्याकडून कोणता प्रतिसाद मिळतो याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाडिक यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर धनंजय महाडिक यांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीचे वक्तव्य केले आहे. महाडिक म्हणाले, की सतेज पाटील आणि माझी चांगली मैत्री होती. त्यांचा मला विरोध असल्याने पक्षाने, शरद पवार यांनी सांगितल्यास आपण त्यांची भेट घेऊ. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत सतेज पाटील यांचा विरोध मावळेल आणि ते सहकार्य करतील अशी अपेक्षा महाडिक यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सतेज पाटील यांचे वडील डॉ. डी. वाय. पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आहेत. शरद पवार पंतप्रधान व्हावेत अशी त्यांच्यासह सगळय़ांची इच्छा आहे. अशा वेळी वडिलांच्या इच्छेविरोधात सतेज पाटील जाणार नाहीत, असे धनंजय महाडिक म्हणाले.

‘सतेज पाटील त्यांच्या कर्माने पराभूत’

गेल्या विधानसभा निवडणुकीत मी त्यांना पराभूत केले असा त्यांचा समज आहे. मात्र मी त्यांना मदत केली नाही हे खरे असले तरी विरोध केला नाही. जर त्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असती तर मी त्यांचा प्रचार केला असता, पण त्या वेळी ते त्यांच्या कर्माने पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीला आम्हाला कशी मदत करतात त्यावर त्यांना विधानसभेला मदत करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. सतेज हे सुसंस्कृत असले तरी परिपक्व नाहीत, अशी टिप्पणीही महाडिक यांनी या वेळी केली.