Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ( Akshay Shinde Encounter ) याचा सोमवारी सायंकाळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. बदलापूरमध्ये ऑगस्ट महिन्यात ही घटना घडली होती. एका प्रतिथयश शाळेतील दोन चिमुरड्यांवर अक्षय शिंदेने ( Akshay Shinde Encounter ) लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. ९ तास रेल रोकोही करण्यात आला होता.

बदलापूरमध्ये नेमकी काय घटना घडली?

बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूर मध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. आता या प्रकरणी चकमकीत अक्षय शिंदे ठार ( Akshay Shinde Encounter ) झाला आहे. यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

EY toxic culture controversy ashneer grover
Ashneer Grover EY story: “एक कोटी पगार; तरीही पहिल्याच दिवशी पळालो” अशनीर ग्रोवरनं सांगितला EY कंपनीतील धक्कादायक अनुभव
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
young CA girl at Ernst & Young reportedly died from work stress
पुणे : सीए तरुणीच्या मृत्यूवर ईवाय इंडियाचे अध्यक्ष राजीव मेमानी मौन सोडून म्हणाले की,…
after post mortem report come out jai malokar death case taken shocking turn
अकोला : मनसैनिक जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; नेमकं घडलं काय?
Pune EY employee die
Pune : “कामाच्या ताणामुळेच माझ्या लेकीचा मृत्यू”, आईने बॉसला धरलं जबाबदार; पत्र सोशल मीडियावर व्हायरल
Madhabi Puri Buch
Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ? ‘हिंडनबर्ग’च्या आरोपांची लोकलेखा समितीकडून चौकशीची शक्यता
SEBI Madhabi Buch questioned by the Public Accounts Committee
‘सेबी’च्या माधबी बुच यांची झाडाझडती? लोकलेखा समितीकडून चौकशीची शक्यता
Kolkata Doctor Case
Kolkata Doctor Case : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात पीडितेच्या पालकांचा पोलिसांवर गंभीर आरोप; म्हणाले, “आम्हाला पैशांची ऑफर दिली, पण…”

हे पण वाचा- Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

काय म्हटलं आहे अमोल कोल्हेंनी?

केवळ एका ‘एन्काऊंटर’ने न्याय मिळाला असं कोणाला वाटत असेल तर ही मोठी धूळफेक आहे. स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यात २१३ माता भगिनींवर अत्याचार झाले आहेत. बदलापूर प्रकरणाला आरोपीवर गुन्हा नोंदवताना झालेली चालढकल, इतर गुन्हेगारांचे अद्याप मोकाट असणे ही पार्श्वभूमी देखील आहे. बदलापूरच्या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अशी मागणी आता अमोल कोल्हे यांनी केली आहे.

Badlapur Crime News
बदलापूरच्या घटनेनंतर नागरिकांचा उद्रेक. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला?

अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार केले. पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. आता या प्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.