राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उस्मानाबाद येथील शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. ‘५० खोके ऑल ओके’ हेच ५० खोके जनसेसाठी खर्च झाले असते तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – “माझ्याकडे पक्षाची निशाणी नसली, तरी फरक पडत नाही”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला!

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले

“शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला त्यांना वेळ”

“राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे असंवेदनशील आहे. हे दोघेही पक्ष फोडणे आणि इतरांना दमदाटी करण्यात यात इतके व्यस्त आहेत, की त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला वेळ नाही. या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही, त्यामुळेच उस्मानाबादच्या शेतकऱ्याने इतकं टोकाचं पाऊल उचललं असावं. या सर्व प्रकाराला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ‘५० खोके ऑल ओके’ हे ५० खोके जनसेसाठी खर्च झाले असते, तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

हेही वाचा – “खरं तर लग्न झाल्या झाल्या…”; दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यावरुन राज ठाकरेंचा शिंदे सरकारला मिश्कील टोला; सभागृहात पिकला हशा

उस्मानाबादच्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

विधानभवनाबाहेर एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. सुभाष भानूदास देशमुख, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेत गंभीररित्या भाजलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे देशमुख यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. देशमुख हे साताऱ्याच्या कांदळगावचे रहिवासी आहेत.

Story img Loader