राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे गेल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाधम्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

“मंत्रीमंडळ आहे कशासाठी? दोनच लोक सगळे निर्णय घेणार असतील तर मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी करायचं तरी काय? सगळ्यात मोठी अडचण आहे की आज सर्वसामान्य मायबाप जनतेने न्याय मागायला कोणाकडे जायचं?, त्यांना जर अडचण आली तर त्यांनी कुणाकडे जायचं? जिल्हापरिषदेची निवडणूक झाली नाही आणि महानगरपालिकांचेही निवडणूक झाली नाही. ईडी सरकार येऊन सहा महिने झाले आहेत, मग हे निवडणुका का घेत नाहीत? त्यांना कशाची भीती आहे निवडणूक घ्यायला?” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

याचबरोबर, “भारतीय जनता पार्टीमध्ये नक्कीच खूप कर्तृत्वान महिला आहेत आमदार म्हणून किंवा आमदार नसल्या तरी संघटनेत तरी आहेतच ना? मात्र यांना(भाजपाला) महिलांबद्दल मनात आदर नाही किंवा प्रेम, आस्था नाही, हे त्यांच्या कृतीमधून दिसतं आहे.” अशी टीकाही त्यांनी भाजपावर केली.

हेही वाचा – राजमाता जिजाऊंचा इतिहास जगभरात पोहचला पाहिजे, परदेशी पर्यटक सिंदखेडराजाला आले पाहिजे – सुप्रिया सुळे

याशिवाय, “ईडी सरकार म्हणजे टेलिव्हिजनवर येणे, धमक्या देणे. मी बच्चू कडू यांचे आभार मानते. कारण, त्यांनीही एक विधान केलं होतं, की आज हे सरकारमधील आमदार कुठेही गेले तरी लोक त्यांना म्हणतात की ५० खोक्यांचा आमदार आला. हे मी म्हटलेलं नाही, हे मी वृत्तवाहिन्यांवरच पाहिलेलं आहे. मी खोटं बोलत नाही आणि कोणावरही खोटे आरोप करत नाही. हे ५० खोक्यांचं सरकार आहे असं वृत्तवाहिनीवर मी ऐकलेलं आहे. ५० खोक्यांचे आमदार किंवा ५० खोक्यांचं सरकार असं जेव्हा म्हटलं जातं, हा अपमान केवळ त्यांचा नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. देशातल्या सगळ्यांना असं वाटतं की महाराष्ट्रातील आमदार ५० खोके घेतले की बिकाऊ आहेत. हे दुर्दैवं आहे. यामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि आपली बदनामी होते.” असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं.

Story img Loader