Supriya Sule On Ajit Pawar: महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सध्या राजकारणात घडामोडींना वेग आलेला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत देखील बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असल्यामुळे राज्याचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तसेच युगेंद्र पवार यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज काल दाखल केला.

त्यानंतर युगेंद्र पवार यांची आज बारामती मतदारसंघात कान्हेरी या ठिकाणी जाहीर सभा पार पडली. त्यांच्या या सभेला शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेत बोलताना भारतीय जनता पार्टीसह अजित पवार यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली. “कॉपी करून पास होण्यात काय मजा? अभ्यास करुन पास होऊन प्रमाणपत्र घेऊन दाखवा”, असं म्हणत नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी खोचक टीका केली.

Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fifth list of 5 candidates
Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Sarad pawar
Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार
Shaina NC vs Atul Shah
Shaina NC vs Atul Shah: ‘निवडणूक म्हणजे संगीत खुर्ची आहे का?’, शायना एनसींना उमेदवारी मिळताच भाजपाचे ज्येष्ठ नेत्याचे बंड; अपक्ष उमेदवारी दाखल करणार
Mohol Constituency Politics
Mohol Constituency Politics : मोठी बातमी! शरद पवारांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलला; सिद्धी कदम यांच्याऐवजी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी
Sharad Pawar and Yugendra Pawar
Sharad Pawar : ५७ वर्षांचा राजकीय प्रवास, बारामती मतदारसंघ अन् पवार घराणं; युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भावूक प्रतिक्रिया!
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!

हेही वाचा : Mohol Constituency Politics : मोठी बातमी! शरद पवारांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलला; सिद्धी कदम यांच्याऐवजी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“महाराष्ट्रात सध्या बरेच कार्यक्रम सुरु आहेत. मी अनेक ठिकाणी लागलेले बॅनर पाहते. त्या बॅनरवर लिहिलेलं आहे की हे चिन्ह तुमचं नाही. या चिन्हाची लढाई न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे ते (अजित पवार) विसरले असतील. मात्र, मी अजून विसरलेले नाही. पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचं काम अदृष्य शक्तीने केलेलं आहे. मी कोणत्याही एका व्यक्तीच्या विरोधात बोलत नाही. मी अदृष्य शक्तीबाबत बोलते. कारण एका अदृष्य शक्तीने आपलं घर फोडलं. पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचं काम केलं. लोकसभेच्या निवडणुकीत मी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार हे देखील मला माहिती नव्हतं”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

“निवडणूक आयोगात ज्यावेळी पक्षाच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरु होती. तेव्हा निवडणूक आयोगात शरद पवार चार-चार तास बसायचे. काही बोलत नव्हते, पण शांत बसायचे. त्या ठिकाणी आम्ही देखील असायचो. तेव्हा अनेकजण आमची मस्करी करायचे. म्हणायचे तुमचं चिन्ह आणि पक्ष जाणार आहे. मात्र, आम्ही काहीही बोलायचो नाही शांत बसायचो. पण मी आजही सांगते की हा देश संविधानाने चालणार आहे. हा देश कोणत्याही अदृष्य शक्तीने चालणार नाही, यावर माझा विश्वास आहे”, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला.

“आरे कॉपी करून पास होण्यात काय मजा? अभ्यास करुन पास होऊन सर्टिफिकेट घेण्याचा आनंद वेगळा असतो. मला आधी वाटायचं की सर्वजण गेले, आता आपलं काय होणार? मी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात दौरे करायचे. तेव्हा मला प्रश्न पडायचे की काय होणार? मात्र, मला लोकसभेच्या निवडणुकीत समजलं की, ताकद फक्त जनतेत असते आणि ते जनतेनं लोकसभेला दाखवून दिलेलं आहे. कोणी काहीही म्हटलं तरी बारामती मतदारसंघ ना मला कळतो, ना त्यांना (अजित पवारांना) कळतो. हा मतदारसंघ फक्त शरद पवारांना कळतो”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली.