Supriya Sule On Ajit Pawar : राज्यात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु असून या दौऱ्यात मेळावे, सभा आणि मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. अशातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत मोठं विधान केलं होतं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केली. आता मला वाटतं की हा निर्णय चुकीचा होता, असं अजित पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. “भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह काय? सगळंच देऊन टाकलं असतं”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरु असून या यात्रेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा