कंत्राटी नोकरभरतीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा जीआर मागे घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली. दरम्यान, त्यांनी कंत्राटी नोकर भरतीचं पाप महाविकास आघाडीचं आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही तर आमच्या पक्षाकडून त्यांना उघडं करू, अशा शब्दांत फडणवीसांनी टीका केली.

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी मंत्र्यांची यादी जाहीर करत फडणवीसांवर हल्लाबोल केला. ‘एक्स’ खात्यावर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भाजपा म्हणजे ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ आहे. माफीनामा…! माफीनामा…! असे ओरडत भाजपाने ढोंगीपणा करून जनतेची दिशाभूल करणे अगोदर बंद करावे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने आपल्या कार्यकाळात कधीही कंत्राटी तत्वावर कार्यकारी पदे भरली नव्हती.”

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
महायुतीत गृहमंत्रीपदावरून तिढा निर्माण झाला आहे. (PC : Devendra Fadnavis FB)
“गृहमंत्रीपद आमच्याकडेच असायला हवं”, फडणवीस महायुतीतल्या तिढ्यावर पहिल्यांदाच बोलले; कारणही सांगितलं
Former Prime Minister Of India Narasimha Rao and Manmohan Singh.
Cash In Parliament : नरसिंह रावांपासून ते मनमोहन सिंग सरकारपर्यंत… संसदेत कधी कधी सापडली कॅश? एका नेत्याला झाला होता तुरुंगवास 
Chief Minister Devendra Fadnavis statement regarding the assurances given
उपमुख्यमंत्री असताना दिलेली हमी पूर्ण झाली नाही, आता मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस… 

हेही वाचा- “मनोज जरांगेंच्या मागणीला माझी मान्यता नाही”, मराठा आरक्षणाबाबत रामदास कदमांची थेट भूमिका

“कंत्राटी पद्धत कुणी सुरू केली? याचा शोध भाजपाने जरुर घ्यावा. राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांनी संघटीतपणे केलेल्या विरोधापुढे हे सरकार झुकले आहे. आता आपले अपयश लपवण्यासाठी माफिनाम्याचे खूळ भाजपाने काढले आहे. उप-उपमुख्यमंत्री महोदयांना जुने संदर्भ काढून आपल्या चुकांचे खापर पुर्वसूरींवर फोडायची खोड आहे. उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा ज्यांच्या मांडीला मांडी लावून सरकार चालवता त्यांच्याशी दोन शब्द बोलून घेतले असते तरी आपण हे ‘हवाबाण’ सोडण्याची हिंमत केली नसती,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“कंत्राटी भरतीचा निर्णय २०११ व २०२१ सालच्या मंत्रिमंडळाने केला म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत सत्ता उपभोगायची. या स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजण्याच्या भाजपा वृत्तीचे कार्ड महाराष्ट्राच्या जनतेपुढे मुळीच चालणार नाही. भाजपाच्या नेत्यांना संदर्भ आठवत नसतील तर पुढील यादीतील नेत्यांना संपर्क साधावा,” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. यावेळी त्यांनी २०११ आणि २०२१ साली मंत्रीमंडळात असलेल्या मंत्र्यांची यादी दिली आहे. यातील बहुसंख्य नेते हे महायुतीच्या सरकारमध्ये आहेत.

हेही वाचा- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कुटुंबातील सदस्याची राहत्या घरी आत्महत्या

२०११ सालातील मंत्री

१. विजयकुमार गावीत
२. राधाकृष्ण विखे पाटील
३. अजित पवार<br>४. नारायण राणे
५. दिलीप वळसे पाटील
६.छगन भुजबळ
७. सुनील तटकरे
८. हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीच्या शासनकाळातील मंत्री…

१. एकनाथ शिंदे<br>२. अजित पवार
३. दिलीप वळसे पाटील
४. छगन भुजबळ
५. उदय सामंत
६. धनंजय मुंडे
७. शंभूराज देसाई
८. गुलाबराव पाटील
९. दादा भुसे
१०. संजय राठोड
११. संदीपान भुमरे
१२ अब्दुल सत्तार<br>१३. संजय बनसोडे
१४. आदिती तटकरे

Story img Loader