गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोंगे आणि त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याबाबतची राज ठाकरेंची भूमिका यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. या नाट्याचाच पुढचा अंक आज महाराष्ट्रात दिसत असून अमरावतीमधील आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली आहे. त्यावरून राजकीय वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“माझी सगळ्या गोष्टींवर श्रद्धा, पण…”

इस्लामपूरमध्ये कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीमध्ये यशवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यानंतर माध्यमांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठणाबाबत घेतलेल्या भूमिकेवर विचारणा केली असता त्यावर सुप्रिया सुळेंनी “माझी सगळ्या गोष्टींवर श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही”, अशी प्रतिक्रिया दिली.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Aishwarya Narkar
“जर मला डिवचलं, तर मी…”, ऐश्वर्या नारकर ट्रोल करणाऱ्यांच्या बाबतीत करतात ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “काय दिवे…”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”

“बाकीचे खासदार काय करतात…”

दरम्यान, यावर बोलताना इतर खासदारांच्या कामाचा फारसा अभ्यास नसल्याचं सुप्रिय सुळे म्हणाल्या. “तुम्हाला खरं सांगू? माझ्या मतदारसंघात मला इतकी कामं असतात, की मला बाकीचे खासदार काय करतात याचा फारसा अभ्यास नसतो. लोकसभा मतदारसंघ, त्याचा व्याप फार मोठा असतो”, असं त्या म्हणाल्या. दिल्लीतील नवनीत राणांच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “नवनीत राणा दिल्लीत खूप अॅक्टिव्ह आहेत. खूप वेळा भाषण करतात. माझ्या दिल्लीतल्या सहकारी आहेत”.

आज मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा राणा दांपत्याने केली होती. या घोषणेपासूनच शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे साकाळीच राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. तसेच, तिथले बॅरिकेड्स तोडून शिवसेना कार्यकर्ते इमारतीमध्ये घुसल्याचं देखील समोर आलं होतं.

Story img Loader