राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा नेते मोहित कम्बोत यांच्या १०० कोटींच्या खटल्यावर उत्तर देताना होय मी भंगारवाला आहे असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नवाब मलिक या शहरात जेवढे भंगार आहेत, त्यांचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि यांचं पाणी केल्याशिवाय थांबणार नाही असा इशाराही दिला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान नवाब मलिक यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची मुलगी सना मलिकनेही ट्वीट केलं आहे. “होय मी भंगारवाल्याची मुलगी! मला अभिमान आहे. मी मराठी मुलगी,” असं ट्वीट करत त्यांनी वडिलांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी #NawabMalikMyHero हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.
नवाब मलिक नेमकं काय म्हणाले –
भाजपा नेता मोहित कम्बोत यांच्याकडून १०० कोटींचा खटला दाखल करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “माझी तर औकात इतकी नाही. माझा ब्रॅण्ड त्यांनी १०० कोटींचा केला आहे. सगळं विकलं तरी माझ्याकडे १०० कोटी नाहीत. ते सांगतात भंगारवाले…पण भंगारवाला काय असतो. होय मी भंगारवाला आहे. माझे वडील कपडे आणि भंगारचा व्यवसाय केला. वयाच्या १६ व्या वर्षापासून ते राजकारणात आमदार होण्यापर्यंत मी भंगारचा व्यवसाय करत होतो. शेजारीच आमचं दुकान आहे, जाताना त्याचे फोटोही काढा. माझे कुटुंब भंगारचा व्यवसाय करतं याचा अभिमान आहे”.
“होय मी भंगारवाला आहे, पण माझ्या वडिलांनी कधीही…,”; १०० कोटींच्या खटल्यावर नवाब मलिकांनी दिलं उत्तर
“माझ्या आजोबांनी कधीही बनारसमध्ये कोणत्या डाकूंकडून सोनं घेतलेलं नाही. माझ्या वडिलानी चोरांकडन सोनं खरेदी केलं नाही. मी कधीही मुंबईत सोन्याची तस्करी केली नाही. मी कोणतं मार्केट बुडवलं नाही. कोणत्याही बँकांचे पैसे खाल्ले नाहीत. मी कंपन्या निर्माण करुन बँकांचे शेकडो कोटी बुडवले नाहीत. माझ्या घरी कधी सीबीआयीने धाड टाकलेली नाही. माझ्यावर कोणताही आरोप नाही. मुख्यमंत्री निधीत तो चेक बाऊन्स मी केला नाही,” असा टोला यावेळी नवाब मलिक यांनी लगावला.
हिवाळी अधिवेशन गाजणार, अधिवेशनानंतर भाजपाच्या नेत्यांना…; नवाब मलिकांचा इशारा
“होय मी भंगारवाला आहे. भंगारवाल्याची किमयागिरी काय असते हे या लोकांना माहिती नाही. जी वस्तू उपयोगी नसते ती उचलून आणतो. त्याचे तुकडे करुन पाणी पाणी करण्याचं काम भंगारवाला करतो. नवाब मलिक या शहरात जेवढे भंगार आहेत, त्यांचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि यांचं पाणी केल्याशिवाय थांबणार नाही,” अशा इशाराही नवाब मलिक यांनी यावेळी दिला.
भाजपा नेते मोहित कम्बोज यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून प्रभाकर साईल समीर वानखेडेंवर आरोप करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोहित कम्बोज यांनी एक व्हिडीओ व्हिडिओ ट्विट केला असून त्यात म्हटंल आहे की, ‘