राज्यात सुरु असलेलं राजकारण हे लोकशाहीला घातक आहे. यातून लोकशाही टिकणार नाही. यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पर्याय म्हणून समोर आलं पाहिजे. तरच लोकशाही टिकेल, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निबांळकर यांनी शिंदे-भाजपा सरकारवर टीका केली आहे. याला राज्याचे उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शंभूराज देसाई म्हणाले की, “राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आलं की लोकशाही टिकते. त्यांनी सत्तेतून पायउतार झालं की, लोकशाहीला धोका निर्माण होतो. मात्र, लोकशाही मार्गानेच विधानसभेत बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन झालं. लोकशाहीतूनच विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली.”

हेही वाचा : …ती बँकच अस्तित्वात नाही, शरद पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठा खुलासा; म्हणाले “हे तर लबाडाच्या घरचं आवतण”

“राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहता…”

“बहुमताचा आदर केला पाहिजे, त्यालाच महत्व आहे. रामराजेंचा पक्ष आता सत्तेत नाही, ही त्यांची खंत आहे. राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यामुळे सत्तेविना ते तळमळत आहेत. पण, त्यांना अडीच नाहीतर पुढील दहा-पंधरा वर्षे सत्तेविना तळमळत राहावं लागणार आहे,” असा खोचक टोला शंभूराज देसाईंनी रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp not coming government shambhuraj desai taunt ncp ramraje naik nimbalkar ssa