आर्थिक संकटाच्या खाईत लोटलेल्या उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपच्या पॅनेलने १५पकी ९ जागा जिंकून बँकेवर वर्चस्व मिळविले. शिवसेना-काँग्रेसच्या पॅनेलला ६ जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांना प्रत्येकी ३ जागा मिळाल्या. अपक्षांची डाळ शिजली नाही.
बँकेच्या निवडणुकीत विक्रमी ९८.९५ टक्के मतदान झाले. प्रत्येक तालुक्यात ९५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. शनिवारी सकाळी येथील महसूलभवनमध्ये मतमोजणी सुरू झाली. सकाळी अकरापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. मतमोजणीदरम्यान महसूलभवन परिसरात निकालात जय-पराजयाचा अंदाज घेत उमेदवार व पुढाऱ्यांनी गर्दी केली होती. निवडणुकीत काँगेस उमेदवार तथा विद्यमान अध्यक्ष बापूराव पाटील अवघ्या एका मताने विजयी झाले. राष्ट्रवादी-भाजप युतीच्या पॅनेलला ९ जागा मिळाल्या. यात राष्ट्रवादीला १२पकी ८, तर भाजपला ३पकी केवळ १ जागा मिळविता आली. शिवसेना-काँग्रेस युतीच्या पॅनेलमध्ये काँग्रेसला ९पकी ३ व सेनेला ६पकी ३ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले.
मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार : सोसायटी – उस्मानाबाद – संजय देशमुख (शिवसेना), तुळजापूर – सुनील चव्हाण (काँग्रेस). उमरगा – बापूराव पाटील (काँग्रेस). कळंब – विकास बारकुल (राष्ट्रवादी). भूम – शिवाजी भोईटे (राष्ट्रवादी). परंडा – ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना). लोहारा – नागप्पा पाटील (काँग्रेस). वाशी – सुग्रीव कोकाटे (राष्ट्रवादी). अनुसूचित जाती-जमाती – कैलास िशदे (भाजप). इतर शेती संस्था – सतीश दंडनाईक (राष्ट्रवादी). विमुक्त जाती-जमाती – भारत डोलारे (राष्ट्रवादी). महिला राखीव – प्रवीणा कोलते (राष्ट्रवादी) व पुष्पा मोरे (शिवसेना). इतर मागासवर्गीय – त्र्यंबक कचरे (राष्ट्रवादी). नागरी सहकारी बँक व पतसंस्था – सुरेश बिराजदार (राष्ट्रवादी).
निवडणुकीत सत्तेच्या हव्यासापोटी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही, हा शिवसेना-काँग्रेस नेत्यांचा आरोप मतदारांनी खरा की खोटा ठरवला याची चर्चा अजूनही राजकीय गोटात सुरू आहे. बँकेला आíथक संकटातून बाहेर काढण्यासाठी सत्तेवर आलेल्या राष्ट्रवादी व भाजपने प्रयत्न करणे क्रमप्राप्त ठरले आहे. या बरोबरच बिगरशेती संस्थांकडे असलेली वारेमाप थकबाकी वसूल झाल्यास बँकेला चांगले दिवस येतील. तुळजाभवानी व तेरणा कारखान्यांकडे असलेली कोटय़वधींची कर्जाची थकबाकी मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याची अपेक्षाही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा