कॉंग्रेस आमदार दिवं. नीलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी यांनी विधानसभा पोटनिवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसमध्ये संभाव्य उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली असून राष्ट्रवादीची आता काय भूमिका राहते, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपातर्फे माजी आमदार मदन येरावार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते गडकरी गटाचे कट्टर समर्थक समजले जातात. भाजप प्रदेशाध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांच्याऐवजी आमदार देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली तरी मदन येरावार यांच्या उमेदवारीबद्दल अनिश्चितता व्यक्त होत नसल्याचे दृष्य आहे. आमदार नीलेश पारवेकर यांचे गेल्या २७ जानेवारीला अपघाती निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी लवकरच यवतमाळ विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या मतदार संघावर कॉंग्रेसचा दावा असला आणि राज्यात आघाडी सरकार असले तरी यवतमाळ जिल्ह्य़ाात मात्र कांॅग्रेस आणि राष्ट्रवादीमधून विस्तवही जात नाही. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीची भूमिका महत्वाचे आहे.

Story img Loader