अलिबाग– वारंवार राजकीय भुमिका बदलणाऱ्यानी मला पक्षनिष्ठा शिकवू नये, नेतृत्व बदल झाला असला तरी मी कालही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होतो आणि आजही आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्यावर केली. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्रीवर्धन येथे इंडीया आघाडीची सभा घेतांना शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी तटकरेंवर निशाणा साधला होता. यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरे यांनी त्यास उत्तर दिले. १९८४ साली मी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. सुरूवातीला काँग्रेसमध्ये होतो. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस स्थापने पासून मी त्याच पक्षात आहे. आज नेतृत्व बदल झाला असला तरी पक्ष आणि पक्षाची विचारसरणी मी सोडलेली नाही. स्वतःसाठी आणि पक्षासाठी वारंवार राजकीय भुमिका बदलणाऱ्या जयंत पाटलांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये असा टोला त्यांनी लगावला.

India alliance
“इंडिया आघाडी अबाधित, पुढच्या लोकसभा निवडणुकीत…”, दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्याचं विधान चर्चेत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Radhakrishna vikhe patil
अण्‍णा हजारे यांच्या विचारांशी फारकत घेणाऱ्या केजरीवालांना जनतेने प्रायश्चित्त करायला लावले – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
K T Rama Rao On Delhi Election Result
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!
AAP leaders discussing strategies while expressing confidence about winning in Delhi, leaving room for collaboration with Congress.
“दिल्ली जिंकण्याचा आत्मविश्वास”, तरीही आम आदमी पक्ष काँग्रेसच्या संपर्कात का?
ABVP opposes Chandrakant Patil demands quality education
चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेला ‘अभाविप’कडून तीव्र विरोध, ‘कॅरी ऑन योजना’ गुणवत्तेसाठी मारक; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सकारात्मक असणे दुर्दैवी
नामदेव महाराज शास्त्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत आहेत. (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Namdev Shastri Kirtan : कोण आहेत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री? त्यांच्या कीर्तनास विरोध का होत आहे?
minister uday samant on Marathi language,
मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा

हेही वाचा >>> “एक उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त, तर दुसरे…”, मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीच्या आमदाराची सरकारवर टीका

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत माझ्या विजयात शेकाप आणि काँग्रेसची मोठी भुमिका होती. हे मी नाकारत नाही. पण विधानसभेत शेकापच्या पराभवाला मी जबाबदार आहे तर ते मी मान्य करणार नाही. विधानसभा निवडणूकीत काँग्रेस उमेदवार निवडणूकीत असा जयंत पाटील यांचा आग्रह होता. पण काँग्रेस मध्ये बंडखोरी झाल्याने त्यांचे निवडणूकीतील गणित फसले, त्यावेळी मला अलिबाग मध्ये प्रचाराला येण्याची गरज नाही असेही पक्षाच्या नेत्यांनी सांगीतले होते. त्यामुळे मतदारसंघातील पराभवाचे खापर माझ्यावर फोडणे चुकीचे असल्याचे तटकरे म्हणाले.

हेही वाचा >>> “माझ्या घरावर हल्ला करणाऱ्यांमध्ये…”, मराठा आंदोलकांवरील आरोपांनंतर प्रकाश सोळंकेंचं खळबळजनक वक्तव्य

२००९ च्या लोकसभा निवडणूकीत शेकापने शिवसेनेशी युती केली. त्यावेळी भाजप त्यांचा सहकारी पक्ष होता. २०१४ लोकसभा निवडणूकीत त्यांनी शिवसेनेशी युती तोडली, आणि स्वतःचा उमेदवार उभा केला. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली. आणि आता इंडीया आघाडीत सहभागी झालेत. यावरून शेकापच्या राजकीय भुमिका बदलत गेल्या याची प्रचिती येते. २०१७ मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीपूर्वी आघाडीची जी बैठक झाली होती. त्यात कोणाच्या कितीही जागा आल्या तरी पहिली अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असेल, तर नंतरची अडीच वर्ष शेकापचा अध्यक्ष असेल असे ठरले होते. त्याप्रमाणे आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे तर नंतर शेकापचा योगिता पारधी अध्यक्ष झाल्या. उलट निलीमा पाटील यांना अर्थ व बांधकाम खाते देऊन आम्ही आघाडीचा धर्म पाळला असल्याचे त्यांनी सांगीतले.

अजित पवारांनी सांगितल्यास रायगडमधून खासदारकीची निवडणूक लढवणार

येणारी लोकसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढविणार आहोत. ज्या जागा ज्या पक्षाला मिळतील त्या तो पक्ष पूर्ण ताकदीने लढवेल. रायगडची जागा कोणाला जाईल हे आत्ताच सांगता येणार नाही. कारण जागा वाटपाचा निर्णय तिनही पक्षाचे नेते एकत्रितपणे घेतील, असे असले तरी जर रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आणि आमच्या पक्षाचे नेते अजित पवार यांनी ही जागा मला लढविण्यास सांगितली तर मी ती पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध, पण समाजाने शांतता राखावी.

मराठा समाजाला कायदेशीररित्या टिकेल असे आरक्षण देण्यास सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे. सरकारही त्यासाठी कटिबद्ध आहे. पण मागासवर्गीय आयोगाच्या अहवाला शिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. सर्वोच्य न्यायालयाचा मागील निकाल लक्षात घेऊन सरकारला पाऊले उचलावी लागतील. त्यास काही वेळ जाईल. तोवर मराठा समाजाने संयम आणि शांतता राखावी असे आवाहनही तटकरे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे अलिबाग विधानसभा अध्यक्ष अमित नाईक आणि चारूहास मगर उपस्थित होते.

Story img Loader