केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यात एका बैठकीदरम्यान खडाजंगी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत असल्याचं दिसून आलं. नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांच्यासोबतच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारायण राणेंना खोचक सल्ला देण्यात आला आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

शुक्रवारी झालेल्या या बैठकीनंतर नारायण राणेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना टीका केली होती. “कोणता विषय कधी घ्यावा, हे विनायक राऊत यांना समजत नाही. हे त्यांचे अज्ञान आहे. मी असताना विनायक राऊत सुरवात करू शकतात का?” असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”

“अजित पवार यांनी थापा मारण्याचे काम मीडियासमोर केले असून ते आपण ऐकलं आहे. त्यासाठी विशेष पत्रकार परिषद घेऊ”, असंही राणे यावेळी म्हणाले.

“बाकीच्यांचं ठीक आहे, पण…”

दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते रविकांत वरपे यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावतानाच सल्लाही दिला आहे. “अजित पवार थापा मारतात – नारायण राणे.. राणेसाहेब, एक आपुलकीचा सल्ला! बाकीच्यांचे ठीक आहे पण अजितदादांचा नाद करू नका”, असं ट्वीटमध्ये वरपे म्हणाले आहेत.

विनायक राऊत यांच्याशी खडाजंगी झाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांचं अज्ञान…”

“अजितदादा थापा मारतात की काय करतात ते एकदा देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील, पडळकर वगैरेंना विचारून घ्या”, असा टोलाही वरपे यांनी लगावला आहे.

या ट्वीटमध्ये रविकांत वरपेंनी नारायण राणेंना टॅग केलं आहे.

Story img Loader