राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार सध्या चर्चेत आहेत. रोहित पवार सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. रोहित पवारांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत रोहित पवारांनी वैयक्तिक आयुष्याबरोबरच राजकीय जीवनातील विविध मुद्यांवर भाष्य केलं.
‘मराठी किडा’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवारांनी त्यांच्या जीवनातील भावनिक प्रसंग सांगितला. राजकारणात येण्याआधी रोहित पवार कौटुंबिक व्यवसायात सक्रिय होते. त्यांच्या आजोबांनी सुरू केलेल्या बारामती अॅग्रोचं कामकाज रोहित पवार पाहत होते. वडिलांना मदत व्हावी म्हणून त्यांनी वयाच्या २१व्या वर्षांपासूनच व्यवसायात लक्ष घातलं. यादरम्यान अनेक प्रसंगांचा सामना रोहित पवारांना करावा लागला.
हेही वाचा>> “मला एक मुलगी आवडते, असे…”, रोहित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “मुंबईतील एका आमदाराने…”
रोहित पवारांना यासंबंधी मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. “व्यवसाय करत असताना कधी रडण्याचा प्रसंग आला होता का? हे आपल्याकडून होणार नाही असं कधी झालेलं का?” असं रोहित पवारांना विचारलं गेलं.
“मला सहसा रडू येत नाही, पण तेव्हा डोळ्यांतून…”, रोहित पवारांनी सांगितला ‘तो’ भावनिक प्रसंग, नेमकं काय घडलं होतं? असं करू का?
मुलाखतीत विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित पवारांनी एक भावनिक प्रसंग शेअर केला. रोहित पवार म्हणाले, “हो, असा प्रसंग माझ्या आयुष्यात आला होता. शेवटी, मी पण एक माणूसच आहे. फॅक्टरीमध्ये एक टेक्निकल अडचण आली होती. एक मशीन बंद पडलं होतं. आम्ही खूप जुगाड केला, पण काहीच झालं नाही. त्यामुळे कामगारांचे पगार वेळेवर देता येणार नव्हते, हे मला कळलं होतं. या गोष्टीमुळे मला खूप वाईट वाटलं. मी सहसा रडत नाही. पण त्यावेळी माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे दोन-तीन थेंब आले.”